लव्ह, सेक्स और धोखा! लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

लव्ह, सेक्स और धोखा! लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

परस्पर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : परस्पर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 'ज्या संबंधांतून भविष्यात लग्न होणार नाही, हे माहिती असतानाही महिलेनं सहमतीनं एखाद्या पुरुषासोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही', असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यासंदर्भात एका महिलेनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिलेने केला होता. तक्रारदार महिला सीआरपीएफमध्ये असलेल्या या अधिकाऱ्याला 1998 पासून ओळखत होती. 2008 मध्ये त्यानं लग्नाचे आश्वासन देत बळजबरीने शारीरिक संबंध केले, असा आरोप या महिलेने केला. पण 2014 मध्ये त्यानं काही कारणास्तव महिलेला लग्नास नकार दिला. यानंतरही 2016पर्यंत दोघांचेही प्रेमसंबंध सुरूच होते. पण संबंधित अधिकाऱ्यानं  काही दिवसांनंतर दुसऱ्या महिलेसोबत साखरपुडा केल्याची माहिती मिळताच महिलेनं त्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

(वाचा : EDच्या चौकशीला निघालेल्या राज ठाकरेंवर अंजली दमानियांनी केली 'ही' खोचक टीका)

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. दोघांमधील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांदरम्यान दोघेही सहमतीनं शारीरिक संबंध ठेवत होते.

(वाचा : पुण्यात भर रस्त्यात तिने दिली कपडे काढायची धमकी.. पोलिसांवर केली अश्लील शेरेबाजी)

या संबंधांतून भविष्यात काहीही साध्य होणार नाही, हे महिलेला माहिती असतानाही तिनं शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे यास बलात्कार म्हणता येणार नाही, असं म्हणत न्यायालयानं महिलेची याचिका फेटाळली.

(वाचा :  नागपुरात एकाच रात्री तीन खून, अद्रकाचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भोसकले)

VIDEO : शिवसेनेच्या संजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या