सासू-सुनेच्या भांडणात निष्पाप जिवाचा बळी, आईनंच अडीच वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

सासू-सुनेच्या भांडणात निष्पाप जिवाचा बळी, आईनंच अडीच वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

एका आईनंच आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासू-सुनेच्या वादातून हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

पणजी, 18 सप्टेंबर : एका आईनंच आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासू-सुनेच्या वादातून हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण गोव्यातील बेतालभाटी येथील ही धक्कादायक घटना आहे. आझिया रॉड्रिग्ज असं आरोपी महिलेचं नाव आहे. आझियानं स्वतःची अडीच वर्षांची मुलगी कीम हिची हत्या केली. मंगळवारी (17 सप्टेंबर)  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कीमची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. आझियाने नैराश्यातून हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितलं.

वाचा :धक्कादायक! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आईला, 5 वर्षांच्या मुलाचं कापलं शीर

आझियाचा पती जहाजावर नोकरी करत असून आझिया सासू आणि मुलगी कीमसोबत नागवाडा-बेतालभाटी येथे वास्तव्यास होती. आझियाचं सासू सेबेस्तियानासोबत अजिबात पटत नव्हतं. मंगळवारी दुपारी सेबेस्तियानानं शेजारणीला आपल्यासोबत पोलिसात येण्याची विनंती केली. सासू आपला छळ करत असून तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यास जायचं आहे, असे आझियाने शेजारणीला सांगितले.

(वाचा :धक्कादायक! नकोशीला फेकलं जंगलात, पुण्यात रक्तबंबाळ अवस्थेत सापडली चिमुकली)

आझिया आणि शेजारीण पोलिस स्थानकावर जाण्यास निघाल्यांतर सेबेस्तियाना यांनी शेजारणीच्या पतीला आपल्या घरी यायला सांगितले. घरी पोहोचल्यानंतर दोघांनाही कीम निपचीत अवस्थेत पडलेली त्यांना आढळली.  उठवण्याचा प्रयत्न करूनही कीम न उठल्याने तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं आणि आझियानं हे कृत्य केल्याचे त्यांना जाणवले.

(वाचा :पतीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात 5 महिन्यांच्या गर्भवतीनं इमारतीवरून मारली उडी)

आझियासोबत गेलेल्या शेजारणीला तिच्या पतीने मोबाइलवरून घडलेला प्रकार सांगितला. तोपर्यंत आझिया आणि शेजारी राहणारी महिला पोलीस स्थानकांत पोहोचल्या होत्या. शेजारणीने पोलिसांना आझियानं केलेल्या कृत्याची माहिती दिली. यानंतर तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सतर्क पोलिसांनी तिचा पकडलं. सेबेस्तियाना यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कीमला मडगावमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, कारण दिलं - पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 06:54 AM IST

ताज्या बातम्या