अतिशहाणपणा नडला! दारूच्या नशेत सापासारखी चालवली गाडी आणि...

अतिशहाणपणा नडला! दारूच्या नशेत सापासारखी चालवली गाडी आणि...

बाईक सुसाट तरुण तराट! दारूच्या नशेत स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

  • Share this:

फरीदाबाद, 08 डिसेंबर: दारूच्या नशेत सुसाट बाइक चालवत असताना महामार्गावर अपघात झाला. तीनही तरुण दुचाकीवरून थेट डिव्हायडरवर आदळले आणि दुचाकी महामार्गावरून पुढे गेल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ह्या तरुणांनी शुद्ध हरपेपर्यंत दारू प्यायली होती. दिल्लीतून फरीदाबादला जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत तीन तरुण NH-19 महामार्गावर सुसाट दुचाकी चालवत होते. त्यावेळा भरवेगात असलेली दुचाकी दुभाजकावर आदळली आणि रिव्हर्स होऊन पुढे गेली तर तीनही तरुण थेट खाली पडले.

अपघात झालेल्या तरुणांना नागरिकांनी हलवलं तरीही त्यांना कोणतीही शुद्ध नव्हती. या अपघातात तरुण जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना नागरिकांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. वारंवार वाहतूक पोलिसांकडून मद्यपान करून दुचाकी न चालवण्याचं आवाहन केलं जातं. तरीही हे तरुण सुसाट वाटेल तसे मनमानी करून महामार्गावर दुचाकी चालवत होते.

वाचा-

डॉक्टरने काढला मद्यधुंत तरुणांचा व्हिडिओ

व्हिडिओ काढणाऱ्या डॉक्टर सौरभ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत सुसाट दुचाकी चालवताना पाहिलं होतं. त्यांना रोखून डॉक्टरांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणांनी त्यांचं म्हणणं उडवून लावलं. त्यांनंतर जनजागृती करण्याच्या हेतूनं हा व्हिडिओ काढला असल्याची कबूली डॉक्टर सौरभ यांनी दिली. तीन तरुणांना त्यांनी जुना फरीदाबाद उड्डाणपुलावरून जाताना पाहिलं. हे तरुण दुचाकीवर झुलत जात होते. त्याचवेळी गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. डॉ. सौरभ यांनी गाडी थांबवून तातडीनं रुग्णावहिका बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केलं. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी डॉक्टर सौरभ यांनी दिली.

थोडंजरी डिव्हायडर ओलांडून हे तीन तरुण पलिकडे पडले असते तर त्यांचा मृत्यू झाला असता. कारण पलिकडच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या ह्या वेगात होत्या अशी भीती डॉ. सौरभ यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी गस्त वाढवून अशा मद्यधुंद तरुणांवर कारवाई करावी अशी विनंतीही प्रत्यक्षदर्शीने केली आहे. या मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Dec 8, 2019 02:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading