हार्ट अॅटॅकने घेतला आणखी एका क्रिकेटपटूचा बळी, फलंदाजी करताना मृत्यू

हार्ट अॅटॅकने घेतला आणखी एका क्रिकेटपटूचा बळी, फलंदाजी करताना मृत्यू

मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात राजेश घोडके खेळत होते. नॉन स्ट्राईकवर असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खेळपट्टीवरच कोसळले.

  • Share this:

पणजी, 13 जानेवारी : मैदानात ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने 44 वर्षीय क्रिकेटपटू राजेश घोडगे यांचं निधन झालं आहे. राजेश हे नॉन-स्ट्राईक एंडवर उभे असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात राजेश घोडके खेळत होते. नॉन स्ट्राईकवर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ते खेळपट्टीवरच कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथं त्यांचा मृत्यू झाला आहे.

राजेश घोडगे हे गोव्याचे माजी क्रिकेटपटू राहिलेले आहेत. आपल्या संघासाठी त्यांनी अनेकदा मॅचविनिंग कामगिरी केली. पण या क्रिकेटपटूचा ह्रदयविकाराने मैदानातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचं लोन हे आता खेळाडूंपर्यंतही पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या भांडूपमध्ये एका 24 वर्षाच्या मुलाचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला होता. वैभव केसरकर असं या मुलाचं नाव असून क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं. रूग्णालयात उपचारासाठी नेलं असताना त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला कार्डियाक अटॅक आल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वीच विद्याविहार इथं सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच करत असताना जीबीन सनी या तरूणाचा मृत्यू झाला होता. मुंबईत महिनाभरात अशा प्रकारे हार्टअॅटॅकमुळं तिसऱ्या मुलाचा मृत्यू झालाय. बदललेली जीवनशैली याला कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

VIDEO: बेस्ट संप: 'बजेटचं विलिनीकरण करू, पण अवाजवी मागण्या अमान्य'

First published: January 13, 2019, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading