राज्यसभेत न बोलता आल्यामुळे सचिनची फेसबुकवर शानदार 'बॅटिंग'

राज्यसभेत न बोलता आल्यामुळे सचिनची फेसबुकवर शानदार 'बॅटिंग'

स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट स्पोर्टस् शहरही व्हावीत अशी इच्छाही सचिनने बोलून दाखवली.

  • Share this:

22 डिसेंबर :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एरवी त्याच्या बोलण्यापेक्षा खेळातूनच आपल्याला जे बोलायचं ते दाखवतो. पण खासदार असलेल्या सचिनला राज्यसभेत गदारोळामुळे बोलता आलं नव्हतं. त्यामुळे आज सचिन फेसबुक लाईव्ह करून अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर बोललाय.

फेसबुक लाईव्ह करून खासदार सचिन तेंडुलकरने  भारताला स्पोर्टिंग नेशन बनवण्याची आपली इच्छा आहे. भारत केवळ खेळांना प्रोत्साहन देणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा, असं आपल्याला वाटतं, असं सचिननं म्हटलंय.  तसंच स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट स्पोर्टस् शहरही व्हावीत अशी इच्छाही सचिनने बोलून दाखवली.

अनेक महान क्रिकेटर आहे ज्यांनी देशासाठी चांगले योगदान दिले आहे. पण मला असं वाटतं काँग्रेस पक्षाच्या अशा व्यवहारामुळे ते नाराज असतील. मी काँग्रेसच्या या व्यवहाराचा निषेध करतो असंही सचिन म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 07:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading