Sheila Dikshit : शीला दीक्षितांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

Sheila Dikshit : शीला दीक्षितांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

Sheila Dikshit : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी निधन झालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जुलै : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी निधन झालं. शनिवारी (20 जुलै) दुपारच्या सुमारास एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या हृदयसंबंधित आजाराविरोधात झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शनिवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांचं पार्थिव निजामुद्दीन येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

काँग्रेस कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार पार्थिव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींपर्यंत अनेक नेत्यांनी शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारनं येथे दोन दिवसांचा राजकीय शोक घोषित केला आहे. उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतची घोषणा केली. रविवारी (21 जुलै ) दुपारी 12.15 ते 1.30 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. यानंतर निगमबोध घाटावर त्यांचं पार्थिव नेण्यात येईल, येथे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येतील.

(वाचा : शीला दीक्षित यांची 'दिल्लीवाली' प्रेमकहाणी, बसमध्ये केलं प्रपोज)

(पाहा PHOTO : शीला दीक्षित यांच्याबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील)

लोकसभा निवडणुकीपूर्वी शीला दीक्षित यांच्याकडे दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मात्र नंतर काँग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी केली. नंतर त्या पुन्हा दिल्लीत सक्रिय झाल्या. दिल्लीच्या विकासात त्यांचं योगदान होतं. १९९८ सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळलं.  परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले. आ आधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना कॉमनवेल्थ खेळाच्या आयोजनात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर आरोपही झाले होते. गांधी घराण्याच्या त्या विश्वासू होत्या. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्दी गाजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

VIDEO: नारायण राणे पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, यासोबत टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या