तामिळनाडू, 23 जानेवारी : तामिळनाडूमधील राणीपेट जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या इथं किलीवेडी गावात ही घटना घडली आहे. किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो भाविका या मेळाव्यात हजर होते.
तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन कोसळली, 3 जणांचा मृत्यू pic.twitter.com/1fTlzxnvd2
— News18Lokmat (@News18lokmat) January 23, 2023
या उत्सवादरम्यान, एका क्रेनच्या मदतीने भलामोठा हार आणला होता. धक्कादायक म्हणजे, क्रेनला जिथे हार लटकलेला होता, त्यावर काही तरुण उभे होते. पण, अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली तेव्हा तोल जाऊन क्रेन खाली आदळली. अचानक क्रेन कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
('गोहत्या थांबवल्या तर जगातील सर्व समस्या संपतील' : गुजरात कोर्ट)
क्रेनखाली दबून ज्योती बाबू या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. किलावथम भूपालन आणि मजूर मुठ (42) या मजुराचाही क्रेनखाली दबून मृत्यू झाला. या अपघातात एका मुलीसह ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोनम शासकीय रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींना उपचारासाठी पुन्नई हॉस्पिटल आणि अरक्कोनम सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. काही जखमींना अरक्कोनम शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारासाठी तिरुवल्लूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: तामिळनाडू