सोलापूरच्या सभेत PM मोदींची प्रशंसा करणं महागात, पक्षाकडून निलंबन

सोलापूरच्या सभेत PM मोदींची प्रशंसा करणं महागात, पक्षाकडून निलंबन

पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते 30 हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं.

  • Share this:

सोलापूर, 5 मार्च : सोलापूरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणं सीपीआयएमचे नेते नरसय्या आडम यांना महागात पडलं आहे. कारण शिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षानं केंद्रीय समितीतून त्यांचं तीन महिन्यांसाठी निलंबन केलं आहे.

पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते 30 हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. तसंच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभादेखील झाली.

मोदींच्या याच सभेत 30 हजार विडी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सीपीआयएमचे नेते नरसय्या आडम यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे व्यासपीठावरुन जाहीर आभार मानले होते.

मोदींचा सोलापूर दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी 30 हजार घरांच्या प्रकल्पाच्या भूमीपूजनाबरोबरच महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्टसिटी अंतर्गत झालेली कामं आदी विकास कामांचेही उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

राष्ट्रवादीने केली निदर्शनं

सोलापूर दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली होती. मोदींच्या फसव्या हे आंदोलन असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं. 2 कोटी युवकांना रोजगार, सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचे आश्वासन, धनगर आणि मुस्लीम आरक्षण आदी गोष्टींची पूर्तता न केल्याने आंदोलन करण्याची भूमिका घेतली, असं त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं. यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं होतं.


VIDEO : हवाई हल्ल्याबद्दल अमित शहांचं विधान आश्चर्यकारक - शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 07:48 AM IST

ताज्या बातम्या