मोदी सरकार देणार गायींना आधार कार्ड!

मोदी सरकार देणार गायींना आधार कार्ड!

गाईंची तस्करी रोखण्यासाठी त्यांना आधारकार्ड देण्याचा विचार, सुप्रीम कोर्टात सरकारनं मांडला आधार कार्डाचा प्रस्ताव

  • Share this:

24 एप्रिल :  मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आधारकार्डचं महत्त्व तसं वाढलं आहे. भारतीय नागरीकांना जवळजवळ सर्वच क्षेत्रात आधारकार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. पण आता नागरिकांप्रमाणे तुमच्या गायीचंही आधार कार्ड असू शकतं. होय! खुद्द सरकारने काल सुप्रीम कोर्टात ही शक्यता बोलून दाखवली आहे.  गायींची कत्तल आणि बेकायदा तस्करी रोखण्यासाठी गायींना आधार प्रमाणेच विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे असं म्हटलं आहे.

अखिल भारतीय कृषी गोसेवा संघनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान केंद्र सरकारच्या प्रतिनिधी याबाबतची माहिती दिली आहे. प्राण्यांची, विशेषत: गायींची माहिती ठेवणं हा यामागचा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितल.

या प्रस्तावानूसार भारत-बांगलादेशच्या सीमेवर प्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 प्राण्यांना सामावून घेऊ शकणारं सुरक्षागृह उभारावं, असं सुचवण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक गाय व तिच्या बछड्याची माहिती राहावी, यासाठी त्यांना युआडी क्रमांक द्यायला हवा. तसं झाल्यास गायीची जात, वय, रंग आदी गोष्टींची माहिती ठेवता येईल. तसंच, यूआयडीसारख्या यंत्रणेद्वारे गायींचं निश्चित स्थान कळेल, त्यामुळे ट्रॅक करणं सहज शक्य होईल, अशी माहिती सरकारने सुप्रीम कोर्टात दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 10:16 AM IST

ताज्या बातम्या