VIDEO : कपड्याच्या दुकानात येते गाय, गादीवर बसून निवांत करते आराम!

VIDEO : कपड्याच्या दुकानात येते गाय, गादीवर बसून निवांत करते आराम!

गेल्या सहा महिन्यांपासून ही गाय दुकानात येते. विशेष म्हणजे, या गायीने कुणालाही इजा पोहोचवली नाही.

  • Share this:

हैदराबाद, 06 नोव्हेंबर : कपड्याच्या दुकानामध्ये खरंतर महिला आणि पुरुषांची नेहमी गर्दी पाहायला मिळते. पण, हैदराबादमधील एका दुकानात चक्क गाय येते आणि तिही रोज येते. विशेष म्हणजे, या व्हीआयएपी गायाची सोयही तशीच ठेवली जाते.

घडलेली हकीकत अशी की, मयुदुकुर बाजार परिसरात साईराम नावाचे कपड्याचे दुकान आहे. एकेदिवशी रस्त्याने फिरणारी मोकाट गाय थेट दुकान शिरली आणि दुकानात आथरलेल्या गादीवर जाऊन विराजमान झाली. जवळपास दोन -तीन तास ही गाय निवांत आराम करते आणि नंतर निघून जाते. पण, जेव्हा ती दुकानात असते तेव्हा कोणतंही नुकसान करत नाही.

दुकानाचे मालक ओबैया यांनी ही गोमाता आहे असं सांगितलं. ओबैया म्हणाले की, ही गाय गेल्या सहा महिन्यांपासून न चुकता रोज येते. सुरुवातील आम्हाला शंका आली की, ही गाय इथं कशाला येते. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होईल. म्हणून आम्ही या गायीला पळवून लावण्यासाठी प्रयत्नही केला. पण, तरीही ती गाय तिथे कायम येत होती. पण आमच्या लक्षात आलं की, दुकान आल्यानंतर ही गाय कोणतंही नुकसान करत नाही आणि कुणालाही इजा करत नाही. त्यानंतर आम्ही या गायीला रोज येऊ दिलं.

ते पुढे म्हणाले की, या गायीमुळे आमच्या दुकानाला प्रसिद्धी मिळाली आहे. अनेक लोकं या गायीला पाहण्यासाठी आणि तिचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.

आता या गायीसाठी दुकानाचे दार मोकळे झाले आहे. ही गाय रोज दुकानात येते आणि लोकं तिची पूजा करतात.

=============================

Published by: sachin Salve
First published: November 6, 2019, 7:15 PM IST
Tags: cow

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading