आईची औषधं, शिक्षणासाठी जीवाची पर्वा नाही; 12 वीचा विद्यार्थी कोविड रुग्णालयात करतोय हे काम

आईची औषधं, शिक्षणासाठी जीवाची पर्वा नाही; 12 वीचा विद्यार्थी कोविड रुग्णालयात करतोय हे काम

हे काम धोक्याचे आहे. मात्र आपल्या आजारी आईची औषधं आणि शिक्षणाचा खर्च करण्यासाठी त्याला हे काम करावं लागत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली. यातून अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. मात्र 12 वीत शिकणारा हा मुलगा खचला नाही. आर्थिक परिस्थितीतवर मात करण्यासाठी त्याने हा पर्याय निवडला ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी बारावीत शिकणाऱ्या चांद मोहम्मदचे जीवन सुरळीत सुरू होते. चांदला मोठं होऊन डॉक्टर होण्याची इच्छा आहे. लॉकडाऊनमुळे चांदच्या भावाने नोकरी गमावली. त्यानंतर घराची आर्थिक परिस्थिती खालावली. अशा परिस्थितीत चांद घाबरला नाही..आईची औषध आणि आपल्या शिक्षणासाठी त्याने काम करण्याचं

ठरवलं. तो सध्या कोविड रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णांचे मृतदेह उचलण्याचे काम करीत आहे. हे काम धोक्याचे आहे. मात्र या विद्यार्थ्याच्या आईला थायरॉईडचा आजार आहे. अशा परिस्थितीत चांदला दररोज हे काम करावे लागत आहे.

कोरोना बाधितांचे मृतदेह उचलावे लागतात

आता अशी परिस्थिती झाली आहे की आईच्या औषधासाठी आणि आपल्या भावंडांची शालेय फी भरण्यासाठी चांद याला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांचा मृतदेह उचलावा लागला आहे. त्याच्या आईच्या उपचारांसाठी पैसे नाहीत आणि कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला हे काम करावे लागत आहे.

लॉकडाऊन दरम्यान मोठ्या भावाची नोकरी सुटली

अमर उजालाच्या वृत्तानुसार चांद मोहम्मद 20 वर्षांचा आहे. तो दिल्लीच्या सीलमपूर भागातील रहिवासी आहे. त्याचा मोठा भाऊ कृष्णा नगर बाजारात दुकानात काम करायचा. या उत्पन्नातून त्यांचं घर चालत होतं. पण लॉकडाऊन दरम्यान त्याची नोकरी गेली. यावेळी, शेजारी कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी गरजेचे रेशन दिले आणि काही छोट्या मोठ्या व्यवसायातून थोडेफार पैसे मिळत होते. ज्यामुळे कुटुंबाला दोन वेळचं अन्न मिळत होते.

कुटुंबाची अशी परिस्थिती पाहून चांदला एका आठवड्यापूर्वी एका कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात त्याला साफसफाईची नोकरी मिळाली. सध्या चांद येथे आठ तास काम करतो. यावेळी, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह उचलण्याचे काम करतो.

हे वाचा-Sushant Singh Case : पोलिसांना सापडले मोठे पुरावे, या व्यक्तींची होणार चौकशी

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 18, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या