Home /News /national /

कोरोना व्हायरसचा भारतात 11 वा बळी, 54 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोना व्हायरसचा भारतात 11 वा बळी, 54 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

    चेन्नई, 25 मार्च : कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महराष्ट्रात सर्वाधिक 101 आकडा आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे. तमिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे. कोरोनाचा विळखा 100 हून अधिक देशांना बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519 वर पोहोचला आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. . पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यांवरून विना आयडी फिरणाऱ्यांवर आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. देशात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. हे वाचा-दुकानांबाहेर गर्दी करुन तुम्ही जीव धोक्यात घालताय, मोदींचं कळकळीचं आवहन
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या