अशक्य ते शक्य करून दाखवायचा भारताचा इतिहास आहे - पंतप्रधान मोदी

अशक्य ते शक्य करून दाखवायचा भारताचा इतिहास आहे - पंतप्रधान मोदी

"COVID Vaccine ची निर्मिती आणि त्याचं उत्पादन यात भारताची मोठी भूमिका राहील, यात शंका नाही", असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी India Global Week 2020 च्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जुलै : भारत अर्थव्यवस्थेचं पुनरज्जीवन करतो तेव्हा ते सर्व प्रयत्न काळजीपूर्वक केलेले असतात. पर्यावरण आणि अर्थकारण दोन्हीचा विचार भारतीय माणसं करतात. अशक्य ते शक्य करून दाखवण्याच्या जिद्दीने आम्ही काम करतो. जगातल्या सर्वांत भयंकर साथीशी लढताना अर्थव्यवस्थाही आजारी पडू नये या दोन्हीवर आमचं लक्ष आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी India Global Week 2020 च्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केला.

इंडिया ग्लोबल वीक च्या उद्घाटनाच्या सत्राचं अभिभाषण पंतप्रधानांनी केलं. अर्थातच ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने हा सप्ताह साजरा होतो आहे. जगभरातल्या लहान मुलांसाठीच्या लशींपैकी दोन तृतीयांश लशींचा पुरवठा सध्या भारतातून होतो. भारतातल्या औषधनिर्माण क्षेत्रामुळेच जगभरात विशेषतः विकसनशील देशांना स्वस्त दरात औषधं मिळणं शक्य झालं आहे, असं सांगताना मोदींनी COVID लसीसंदर्भातही वक्तव्य केलं. "आता COVID ची लस निर्माण होईल, तेव्हाही जागतिक विचारातूनच ती तयार होईल. COVID Vaccine ची निर्मिती आणि त्याचं उत्पादन यात भारताची मोठी भूमिका राहील, यात शंका नाही", असं पंतप्रधान म्हणाले.

"भारतीय माणसं नैसर्गिकरीत्या सुधारणावादी आहेत. परिवर्तनवादी आहेत. त्यामुळे या संकटातून भारत उभारी घेणार यात शंका नाही. भारताचं परिवर्तन किंवा उभारी ही जगासाठीसुद्धा उभारी ठरेल. कुठल्याही सामाजिक किंवा आर्थिक संकटाचा भारताने यापूर्वीही नेटाने सामना केला आहे", असं मोदी म्हणाले.

 

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 9, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading