मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO: कोण कोरोना, कुठला कोरोना? सर्व नियम धुडकावून भाजप आमदाराच्या मुलाचं लग्न थाटात

VIDEO: कोण कोरोना, कुठला कोरोना? सर्व नियम धुडकावून भाजप आमदाराच्या मुलाचं लग्न थाटात

या घटनेमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कोरोना नियमांना (Corona Guidelines) तिलांजली दिल्याचे दिसून आले. फरबिसगंज मतदारसंघाचे भाजपचे आमदार विद्यासागर केसरी यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे पालन केल्याचे कुठेही दिसून आले नाही.

पुढे वाचा ...

अररिया, 29 एप्रिल : देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट (Corona in India) असून लोकांनी विषाणू संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कोरोनासाठीचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून लोकांनी खबरदारी घ्यावी, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते, मात्र अनेक जण या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करतात. असाच एक प्रकार बिहारच्या अररिया जिल्ह्यातून समोर आला आहे.

सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कोरोना नियमांना (Corona Guidelines) तिलांजली दिल्याचे दिसून आले. फरबिसगंज मतदारसंघाचे भाजपचे आमदार विद्यासागर केसरी यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे पालन केल्याचे कुठेही दिसून आले नाही. लग्नातील व्हिडीओत दिसत असल्यानुसार कोणीही कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसत होते. सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणे गरजेचे असताना गर्दी जमवून मेजवानीही आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या लग्नाला जिल्ह्यातील बडे नते, व्हीआयपी मंडळीही उपस्थित होती.

" isDesktop="true" id="545147" >

कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात असताना, सत्ताधारी नेत्यांनीच असे बेजबाबदार वर्तन केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आमदारांच्या मुलाच्या विवाहात कोव्हिड मार्गदर्शक नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात असताना तेथील पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने टीका करण्यात येत आहे. कोरोनाचे नियम हे केवळ सर्वसामान्यांसाठीच बनवले आहेत का? अशी विचारणा केली जात आहे.

हे वाचा - Corona Pandemic काळात हेल्थ इन्शुरन्स अत्यंत आवश्यक! कशी कराल योग्य विम्याची निवड, वाचा सविस्तर

दरम्यान, देशातील जवळपास सर्वच राज्यांंमध्ये बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या भयानक स्थितीत लोकांना रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील झाले असून रुग्णांचा उपचाराविना मृत्यू (Corona Death) होत आहे. बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात एकीकडे कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत असताना सत्ताधारी लोकच कोरोना नियमांना मूठमाती देत आहेत.

First published:

Tags: Bihar, Corona virus in india, Covid cases