देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मात्र या राज्याने घेतला शाळा सुरू करण्याचा निर्णय

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मात्र या राज्याने घेतला शाळा सुरू करण्याचा निर्णय

या पहिल्या टप्प्यात फक्त 9 त 12 या वर्गातले विद्यार्थीच शाळेत येणार आहेत. केंद्र सरकारने त्याबाबत आधीच मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

  • Share this:

पाटना 22 सप्टेंबर: देशात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. असं असतानाच बिहारने आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यांपासून शाळा बंदच आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. 28 सप्टेंबरपासून शाळा उघडतील असं बिहार सरकारने म्हटलं आहे. त्यासाठी सरकारने काही नियमावलीही तयार केली आहे.

सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येत असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. सुरूवातीला मुलांना आठवड्यातून दोन दिवस शाळेत यावं लागणार आहे. त्याच बरोबर 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही उपस्थित राहावं लागणार आहे. सरकारी खासगी शाळांसाठी हा नियम लागू होणार आहे.

या पहिल्या टप्प्यात फक्त 9 त 12 या वर्गातले विद्यार्थीच शाळेत येणार आहेत. केंद्र सरकारने त्याबाबत आधीच मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

VIDEO: पोलिसांनी दारूवर फिरवला बुलडोझर, शिल्लक बाटल्या उचलण्यासाठी लोकांची गर्दी

दरम्यान, हैदराबादच्या CCMB चे संचालक डॉ. राकेश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताबरोबरच जगभरात देखील A2a स्ट्रेनने कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. भारतात सध्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत.भारतात A3i स्ट्रेनचे रुग्ण अधिक होते त्यामुले A2a वर येणारी लस किती उपयोगी ठरेल ही शंका आधी शास्रज्ञांना वाटत होती पण आता A2a स्ट्रेनमुळेच कोरोना संसर्ग होत आहे त्यामुळे ती लस भारतातील रुग्णाला लागू पडेल.

दरम्यान, भारतात सध्या ज्या प्रकारच्या लसींची चाचणी सुरु असून ती A3i या व्हायरसवर प्रभावी आहे. मात्र सध्या A2a या प्रकारच्या कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने ती लस यावर प्रभावी ठरणार कि नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 22, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या