Home /News /national /

'गोमूत्र प्यायलानं कोरोनापासून दूर राहाल' हा दावा करणाऱ्या भाजप मंत्र्याला झाला COVID-19

'गोमूत्र प्यायलानं कोरोनापासून दूर राहाल' हा दावा करणाऱ्या भाजप मंत्र्याला झाला COVID-19

पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष घोष यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अनेक वेळा चर्चेचा विषय ठरले.

    कोलकाता, 17 ऑक्टोबर : गोमूत्र प्यायल्यानं कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहाल असा दावा करणाऱ्या भाजप मंत्र्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा प्रचाराचा रंगात आला असतानाचा कोरोनाच्या संसर्गाबाबत बंगालच्या भाजप अध्यक्षांना अजब दावा केला होता. गोमूत्र घेतल्यानं संसर्गाचा धोका कमी असतो असा अजब दावा करणाऱ्या दिलीप घोष यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दिलीप घोष यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोष यांना खूप ताप चढत होता त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. तर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप घोष यांना 102 ताप होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्यानं चिंता करण्याचं काही कारण नाही असंही डॉक्टर म्हणाले. हे वाचा-मुहूर्त हुकणार? राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत अखेर एकनाथ खडसे बोलले, VIDEO दोन दिवसांपासून घोष यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना अस्वस्थ होत होतं. त्यांनी कोरोना चाचणी केली आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष घोष यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अनेक वेळा चर्चेचा विषय ठरले. यापूर्वी त्यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की गोमूत्र पिण्यामुळे कोरोना विषाणूसह सर्व प्रकारच्या विषाणूंविरूद्ध लढा देण्यास शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. या व्यक्तव्यानंतर अनेक टीकांना देखील त्यांना सामना करावा लागला होता. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच आता भाजपच्या अध्यक्षांना कोरोना झाल्यानं काहीस अस्वस्थ वातावरण आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: BJP, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या