नवी दिल्ली, 11 जानेवारी: एकीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांच्या संख्येत देशात वाढ होत असतानाच दिसाला देणारी बातमी आहे. 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज चर्चा करणार आहेत. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
कोरोनाच्या लसीकरणाचा मोदी सरकारचा नेमका प्लॅन काय असेल आणि सर्व राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. कोरोनाच्या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी सशर्त मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत आज संवाद साधणार आहेत. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाची एक भव्य मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली स्वदेशी लस कोवॅक्सीनचा समावेश असणार आहे. या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
PM Narendra Modi to interact with Chief Ministers of all states via video conferencing today. They will discuss the #COVID19 situation and vaccination rollout. (File photo) pic.twitter.com/VOtjC9uKhw
— ANI (@ANI) January 11, 2021
हे वाचा- ब्राझीलला हवीये भारताची कोरोना लस; राष्ट्रपती बोल्सोनारोंची PM मोदींना विनंती
पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील कोरोनाच्या सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, या बैठकीत पंतप्रधानांनी कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनाशी संबंधित विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
पश्चिम बंगालमध्ये मिळणार मोफत लस
पश्चिम बंगालमधील जनतेसाठी कोरोनासंदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत राज्य सरकार नियोजन करत असल्याची माहिती ममत बॅनर्जी यांनी ट्वीट करून दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.