मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना लशींचे साडेसात कोटी डोस तयार; मोदी सरकारच्या होकाराची फक्त प्रतीक्षा - पुनावाला

कोरोना लशींचे साडेसात कोटी डोस तयार; मोदी सरकारच्या होकाराची फक्त प्रतीक्षा - पुनावाला

प्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत.  तिथे लसीकरणाचं ड्राय रन होईल. तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार कोरोना लस (Coronavirus Vaccine) ? वाचा सविस्तर

प्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत. तिथे लसीकरणाचं ड्राय रन होईल. तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार कोरोना लस (Coronavirus Vaccine) ? वाचा सविस्तर

प्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत. तिथे लसीकरणाचं ड्राय रन होईल. तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार कोरोना लस (Coronavirus Vaccine) ? वाचा सविस्तर

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
नवी दिल्ली, 31 डिसेंबर: भारतात कोरोना लस (Coronavirus Vaccine) कधी ये याबद्दल good news नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच यायची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक हाय लेव्हल मीटिंग घेऊ कोरोनाचं लसीकरण कधी सुरू करायचं याविषयी चर्चा केली. औषध नियंत्रण महासंचालकांच्या (DCGI) कार्य़ालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या स्वागतालाच आपल्याकडे चांगली बातमी येऊ शकते. दुसरीकडे भारतातले सर्वात मोठे लसउत्पादक असणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला (adar poonawalla serum institute of india ) यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) आणि अॅस्ट्राझेनकानं (Astra Zeneca ) तयार केलेल्या कोरोना लशीला यूकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (pune serum institue of india) या लशीत सहभाग आहे. भारतात ही लस कोव्हिशिल्ड (COVISHEILD) नावानं ओळखली जातं. NEW Covid Strain in India: ‘वेगानं पसरतोय व्हायरस, काळजी घ्या,’ कोरोना लशीला (Covid-19 vaccine) हिरवा कंदील कधी द्यायचा याविषयी चर्चा करायला केंद्रीय मंत्रालयाने मोठी बैठक आयोजित केली आहे. ही बैठक संपल्यानंतर कदाचित भारतात लस उपलब्ध करण्याविषयी माहिती बाहेर येऊ शकेल. दरम्यान लसीकरणाची रंगीत तालीम काही राज्यांमध्ये करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता यापुढे प्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्याला या जागांची माहिती देण्यास सांगितलं आहे. ब्रिटनहून आलेल्या नव्या Coronavirus च्या आणखी 5 केसेस सापडल्या या ठिकाणी लसीकरण मोहिमेला (Dry Run) सुरुवात होईल. या ड्राय रन नंतर मोठ्या प्रमाणावर देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होईल. कोविशिल्ड लशीबद्दल या महत्वाच्या 9 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? याबाबत अधिक माहितीसाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी www.mohfw.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. कोविड-19 (Covid-19) लस ही एकाचवेळी सर्वांना दिली जाणार का? लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. कोरोना लस सर्वांनी घेणं बंधनकारक आहे का? कोविड-19 वरील लस घेणं ऐच्छिक असणार आहे. पण या रोगापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेळापत्रकानुसार कोरोनाचं लशीकरण करून घेणं आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक आणि सहकारी तसंच संपर्कातील व्यक्तींमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून लशीकरण करून घेण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या