मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमित शाहांच्या भेटीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह, भाजप सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना

अमित शाहांच्या भेटीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह, भाजप सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती केंद्रीय मंत्री शेखावत यांनी ट्वीट करून दिली आहे.

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती केंद्रीय मंत्री शेखावत यांनी ट्वीट करून दिली आहे.

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती केंद्रीय मंत्री शेखावत यांनी ट्वीट करून दिली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

जयपूर, 20 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची चाचणी करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी ही चाचणी निगेटिव्ह आली होती. अचानक तब्येत बिघडल्यामुळे पुन्हा एकदा शेखावत यांची चाचणी केली. यावेळी मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे.

केंद्रीय मंत्री शेखावत यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी स्वत:हून केलं आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात भर्ती झाल्याची माहिती त्यांनी दिली.

हे वाचा-'बबड्या एक जबाबदार नागरिक...', या कारणासाठी मुंबई पोलिसांनी केले सोहमचे कौतुक

अमित शाह यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन 3 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्यासोबत कुटुंबियांची चाचणीही केली होती मात्र तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

आता अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी कोरोना टेस्ट केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते रुग्णालयात दाखल झाले असून कोरोनावर उपचार घेत आहेत. संपर्कात आलेल्यांना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हे वाचा-कोरोनानं मोडला मागच्या 15 दिवसांचा रेकॉर्ड, 24 तासांत जवळपास 70 हजार नवे रुग्ण

देशात काय आहे कोरोनाची स्थिती?

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या मााहितीनुसार 24 तासांत 69,652 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 997 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एका दिवसात जवळपास 62 ते 65 हजार नवीन रुग्णांची आतापर्यंत नोंद होत होती. आज मात्र गेल्या 24 तासांतील सर्वात धक्कादायक आकडेवारी आहे. 70 हजाराच्या जवळपास ही आकडेवारी जाणारी आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रतांचा आकडा 28 लाख 36 हजार 926 वर पोहोचला आहे. त्यापैकी 6 लाख 86 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Amit Shah, Coronavirus