मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! कोरोनाग्रस्तांची सेवा करतात म्हणून 3 आरोग्य सेवकांना काढलं घराबाहेर

धक्कादायक! कोरोनाग्रस्तांची सेवा करतात म्हणून 3 आरोग्य सेवकांना काढलं घराबाहेर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या तीन आरोग्य सेवकांना घरमालकाने घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  Suraj Yadav
कोट्टायम, 13 मार्च : देशात कोरोनामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कर्नाटकनंतर दिल्लीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमधून जगभर पसरलेल्या या व्हायरसची भीती सर्वांनाच आहे. याच भीतीपोटी केरळमध्ये कोरोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या तीन पुरुष आरोग्य सेवकांना घरमालकाने घराबाहेर काढलं. तिघेही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत होते. त्यातील एकाने सांगितलं की, जेव्हा तो शिफ्ट पूर्ण करून शुक्रवारी सकाळी घरी पोहोचला तेव्हा घरमालकाने घर रिकामं करण्यास सांगितलं. याबाबत घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. स्थानिक माध्यमांनी याची बातमी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय केली. कोट्टायम रुग्णालयात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या तिघांवर उपचार सुरु आहे. चीनमध्ये तीन महिन्यांपूर्वी आलेल्या कोरोनाने आता विक्राळ रुप धारण केलं आहे. आतापर्यंत 5 हजारापर्यंत लोकांचे जीव गेले आहेत. तर जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 1 लाख 34 हजार पेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. याशिवाय दैनंदिन जनजीवन ठप्प होत चालले आहे. शाळा,कॉलेज, चित्रपटगृह, मॉल इत्यादी काही काळासाठी बंद ठेवण्यात येत आहेत. दरम्यान, ‘कोरोना’चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय. तर यामुळे शेअर बाजार कोसळल्याने आर्थिक क्षेत्रालाही हादरा बसला आहे. हे वाचा : दिल्लीत Coronavirusने घेतला पहिला बळी, 69 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू उद्योगांसोबतच शेअर मार्केटवरही (Share Market) मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.आज सकाळी मार्केट सुरू होण्यापूर्वीच सेन्सेक्स (Sensex) तब्बल 2450 अंकानी घसरला होता. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स तब्बल 3140 अंकानी घसरला आहे. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सच्या पडझडीचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. निर्देशांक 30 हजारांच्या खाली गेल्यानं शेअर मार्केटला सर्किट लागल्याची माहिती समोर आली आहे. निर्देशांक नियंत्रणाबाहेर गेल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग (Trading) थांबविण्यात आलं आहे. आज सेन्सेक्स 3150 अंकांनी कोसळला असून निफ्टी 1000 अंकानी गडगडला आहे. मार्केट सध्या बंद करण्यात आलं असून 10.05 मिनिटांनी सुरू करण्यात येईल. हे वाचा : कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस
First published:

Tags: Corona, Corona virus

पुढील बातम्या