COVID-19: विख्यात गायक S.P. बालसुब्रमण्यम व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

COVID-19: विख्यात गायक S.P. बालसुब्रमण्यम व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

S P Balasubramaniam Health Update: 5 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  • Share this:

चेन्नई 14 ऑगस्ट: विख्यात गायक S.P. बालसुब्रमण्यम (S P Balasubramaniam) यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. चेन्नईतल्या MGM Healthcare हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 5 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र रात्रीपासून प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

13 ऑगस्टला त्यांची प्रकृती जास्त बिघडली त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहितीही हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे.

74 वर्षांचे बालसुब्रम्हण्यम यांचा हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड मोठा दबदबा आहे. आणि त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. 16 भाषांमध्ये त्यांनी 40 हजार गाणी गायली आहे.

ए. आर.रहमान यांनी एस.पी.च्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रार्थना करा असं आवाहन चाहत्यांना केलं आहे. त्यांनी आपल्या गोड आवाजाने सगळ्यांना असीम आनंद दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या