COVID-19: पंतप्रधान मोदींनी कोरोनावर बोलावली बैठक, उद्धव ठाकरेंसह 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार

COVID-19: पंतप्रधान मोदींनी कोरोनावर बोलावली बैठक, उद्धव ठाकरेंसह 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार

रुग्णांची संख्या वाढत असतांना पुढे कशा पद्धतीने जायचे असा आता सगळ्याच राज्यांसमोर प्रश्न आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 18 सप्टेंबर: कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या 23 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत आहेत.

देशातली कोरोनाची स्थिती, वाढत असलेली रुग्णांची संख्या, सगळे व्यवहार सुरू करण्यासाठीचा लोकांचा दबाव आणि पुढची रणनीती यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

काय आहे महाराष्ट्रात स्थिती?

राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतांनाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 21 हजार 907 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.

राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे. तर राज्यात 3 लाखांच्या जवळ Active रुग्ण आहेत.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कुटुंबातील सदस्यही पॉझिटिव्ह

देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून सगळे व्यवहार सुरळीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असतांना पुढे कशा पद्धतीने जायचे असा आता सगळ्याच राज्यांसमोर प्रश्न आहे.

PM मोदींनी कोरोनावर बोलावली बैठक, उद्धव ठाकरेंसह 7 राज्यांचे CM उपस्थित राहणार

देशात कोरोना लशीवरही वेगात संशोधन सुरू असून 2021च्या सुरुवातीला लस निघेत असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉय हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं होतं. राज्याला जास्त आर्थिक मदतीची गरज असून मुख्यमंत्री पंतप्रधानांपुढे असे अनेक प्रश्न मांडणार आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 19, 2020, 9:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या