मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशातल्या 'या' 5 राज्यांमध्ये सर्वात कमी आणि जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, वाचा संपूर्ण यादी

देशातल्या 'या' 5 राज्यांमध्ये सर्वात कमी आणि जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, वाचा संपूर्ण यादी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

देशात कोरोना व्हायरसची (COVID-19 cases in India ) दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. काही राज्य आहेत तिथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. तर काही राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 20 जून: देशात कोरोना व्हायरसची (COVID-19 cases in India ) दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशात 60 हजार 753 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 1,647 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. पॉझिटिव्हीटी रेट 2.98 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, पॉझिटिव्हीटी रेट (daily positivity rate) सलग 12 दिवसांत 5 टक्क्यांच्या खाली आहे. मात्र असे काही राज्य आहेत तिथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. तर काही राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी आहे.

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असलेली 5 राज्य

  • महाराष्ट्र

महाराष्ट्रात शनिवारी 8 हजार 912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासात 257 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात 1 लाख 32 हजार 597 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र राज्यात रिकव्हरी रेट 95.76 असून मृत्यूचे प्रमाण 1.97 टक्के आहे.

  • कर्नाटक

कर्नाटक राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 1 लाख 37 हजार 072 आहे. गेल्या एका आठवड्यापासून 16 राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेटपाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.

  • केरळ

शनिवारी केरळ राज्यात 12 हजार 443 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान सद्यस्थितीत राज्यात 1 लाख 8 हजार 117 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • तमिळनाडू

शनिवारी तमिळनाडू 5,674 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. सध्या राज्यात 67 हजार 629 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

सर्वांत कमी अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 5 राज्यांची यादी

  • झारखंड

झारखंडमध्ये शनिवारी 141 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर राज्यात 1811 केवळ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • नागालँड

या राज्यात 2059 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • नवी दिल्ली

दिल्लीत शनिवारी 135 नव्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला. देशाची आर्थिक राजधानी दिल्लीत 2 हजार 445 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • मध्य प्रदेश

शनिवारी राज्यात 110 नव्या रुग्णांची नोंद झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2727 इतका आहे.

  • उत्तराखंड

या राज्यात 3231 कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Maharashtra