च्विइंगम आणि कोरोनाचं काय आहे कनेक्शन, सरकारनं आणली 3 महिने विक्रीवर बंदी

च्विइंगम आणि कोरोनाचं काय आहे कनेक्शन, सरकारनं आणली 3 महिने विक्रीवर बंदी

सरकारनं च्विइंगम विकण्यावर 30 जूनपर्यंत बंदी आणली आहे यामागचं कारण काय आहे जाणून घ्या.

  • Share this:

शिमला, 05 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. 3 हजारहून अधिक रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. थुंकीतून कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं होतो. हे लक्षात घेऊन च्विंगम विकण्यासाठी सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. च्विंगम खाऊन ते थुंकलं जातं किंवा कागदात गुंडाळून फेकलं जातं. पण त्यातून होणारा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय़ सरकारनं घेतला आहे. खाद्य सुरक्षा आयुक्त आणि अतिरिक्त मुख्य सचिव आर.डी. धीमान यांनी दिलेल्या माहितीनुसार च्विंगम सऱ्हास खाऊन थुंकलं जातं. लाळेतून किंवा थुंकीतून कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं पसरण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं च्विंगम विक्रीवर 3 महिने बंदी घालण्यात आली आहे. 30 जून पर्यंत कोणत्याही प्रकारचं च्विंगम विकता येणार नाही. अवैध पद्धतीनं विकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये गच्चीवर भजी करायला गेले, पोलिसांचा ड्रोन आला आणि...

हिमाचल प्रदेशात शनिवारी 7 नवीन लोकांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिमला इथल्या आयजीएमसी रुग्णालयात या 7 लोकांची चाचणी करण्यात आली त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यापैकी तीन जण हे दिल्लीत झालेल्या मरकजच्या कार्यक्रमातून परत आले होते. तर तीन जण नालागढ परिसरातील आहेत. आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील कोरोनाचा आकडा 13 वर पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 87 संशयित रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. तर शिमला मधील 33 जण होते. त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह आले आहेत. या चौघांनाही आता दिल्लीला हलवण्यात आलं असून सध्या तिथे उपचार सुरू आहेत.

देशभरात कोरोनाचा विळखा वाढत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात हा आकडा जलद गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत देशात 3072 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून गेल्या 24 तासांत 13 जणांचा मृत्यू झाला असून त्या कालावधीत 525 नवीन प्रकरणं समोर आली आहे.

हे वाचा-दिवसा सुरक्षेचं काम, घरी परतल्यावर मास्कचं शिवणकाम, CM कडून कौतुकाची थाप

First published: April 5, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या