Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनासाठी ही औषधं ठरतील प्रभावी, 20 औषधांची ट्रायल सुरु; फक्त सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा

कोरोनासाठी ही औषधं ठरतील प्रभावी, 20 औषधांची ट्रायल सुरु; फक्त सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा

Covid-19 Drugs: कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रभावी औषध बाजारात उपलब्ध नाही आहे.

Covid-19 Drugs: कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रभावी औषध बाजारात उपलब्ध नाही आहे.

Covid-19 Drugs: कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रभावी औषध बाजारात उपलब्ध नाही आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: दोन वर्षांपूर्वी चीन (China) देशात कोरोना व्हायरस (Covid-19) पसरला. त्यानंतर संपूर्ण जग या व्हायरसच्या विळख्यात सापडलं. मात्र तेव्हापासून आजपर्यंत या अत्यंत धोकादायक व्हायरसवर (Corona Virus) मात करण्यासाठी कोणतंही प्रभावी औषध समोर आलेलं नाही. सध्या लसीकरणावर (Corona Vaccination) जोर असला तरी कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रभावी औषध बाजारात उपलब्ध नाही आहे. केवळ इतर आजारांसाठी वापरण्यात येणारी औषधं कोरोना बाधित रुग्णांना दिली जातात. पण आता कोरोनाशी लढण्यासाठी औषधांसंदर्भातली एक चांगली बातमी समोर येत आहे.

सध्या भारतात सुमारे 20 औषधांची ट्रायल केली जात आहे. यापैकी काहींना लवकरच ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची घटती संख्या पाहता असं वाटतं की या औषधांची मागणी या क्षणी थोडी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पण तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, येत्या काही दिवसात येणाऱ्या संभाव्य कोरोनाची लाट थांबवण्यात ही औषधं प्रभावी ठरतील. त्यामुळे अशा लोकांसाठी रामबाण औषध सिद्ध होईल ज्यांची प्रतिकारशक्ती थोडी कमी आहे.

हेही वाचा-  अगली तारीख 16 नोव्हेंबर, अनिल देशमुख हाजीर हो...!!!

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसविरूद्ध भारताच्या लढाईत औषधं खूप महत्वाची भूमिका बजावतील. तज्ज्ञांचा असा युक्तिवाद आहे की, कोविड- 19ची लस केवळ लोकांना प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करेल. पण हा व्हायरस अनेक लोकांचा जीव ही घेऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत या औषधाचा खूप फायदा होईल.

कोणकोणत्या औषधाची सुरु आहे ट्रायल?

मोलनूपीरवीर: अमेरिकन फार्मा जायंट मर्क आणि रिजबॅक बायोथेरप्यूटिक्सचं ओरल अँटीव्हायरल औषध मोलनूपीरवीरने आतापर्यंत कोरोनाविरुद्ध चांगले काम केलं आहे. हे औषध घेणाऱ्या 50% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही आहे. यासह, या औषधाच्या वापरामुळे मृत्यूच्या दरात 50 टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे. सिप्ला, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि टॉरेंट फार्मास्युटिकल्सच्या माध्यमातून या औषधाची भारतात ट्रायल केली जात आहे.

जायडस कॅडिला: अहमदाबादस्थित जायडस कॅडिला ही एकमेव भारतीय कंपनी आहे ज्याने असा दावा केला आहे की, कंपनीनं कॉकटेल उपचार विकसित केले आहेत ज्यात मोनोक्लोनल अँटीबॉडीज तटस्थ आहेत. स्विस औषध निर्माता रोचे यांनी तयार केलेले हे औषध अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलं होतं. सध्या भारतात या औषधाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे.

हेही वाचा- IPL 2021: 'मॉर्गनची हकालपट्टी करा', माजी क्रिकेटपटूचा KKR ला सल्ला! नव्या कॅप्टनचं सांगितलं नाव 

ग्लेनमार्क चे नेजल स्प्रे: मुंबईस्थित ग्लेनमार्कने कोविड -19 साठी नायट्रिक ऑक्साईड नेजल स्प्रे भारतात मोठ्या प्रमाणावर चाचणीसाठी मंजूर केले आहे. यूके मधील स्प्रेवरील करण्यात आलेल्या संशोधनात असं सुचवण्यात आलं आहे की, कोविड -19 रुग्णांमध्ये व्हायरल लोड कमी करण्यासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी नेजल स्प्रे प्रभावी आहे.

आणखी बरीच औषधे: याशिवाय इतर अनेक औषधांवर संशोधन केले जात आहे. त्यात सीबीसीसी ग्लोबल रिसर्चचे निक्लोसामाइड, गुफिक बायोसायन्सचे थायमोसिन α -१ इंजेक्शन, सन फार्माचे औषध याचा समावेश आहे.

हेही वाचा- IPL 2021, MI vs DC : मुंबई इंडियन्सबाबत सेहवागचं मत वाचून रोहित शर्मा होईल नाराज!! 

सरकारच्या सहकार्याची गरज

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सरकारने कोविड 19 च्या ट्रायलला सक्रियपणे समर्थन दिले पाहिजे. यावर बोलताना आरोग्य तज्ज्ञ चंद्रकांत लहरिया म्हणाले की, 'खरं तर, लसीकरणसाठी ज्याप्रमाणे सरकारनं सहकार्य केलं. त्याप्रमाणे औषधांसाठी ही केलं पाहिजे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं ट्रायल पूर्ण होण्यास वेळ लागेल. त्यामुळे सद्यपरिस्थिती पाहता स्वयंसेवक ट्रायलसाठी सहज उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे या ट्रायलना समर्थन देण्याची गरज आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases