कोरोनाची कोट्यवधींची चिनी औषधं भारतीय कस्टम्सने अडवली; तुटवड्यामुळे किमती झाल्या दुप्पट

कोरोनाची कोट्यवधींची चिनी औषधं भारतीय कस्टम्सने अडवली; तुटवड्यामुळे किमती झाल्या दुप्पट

अनेक दिवसानंतरही परवानगी न मिळाल्याने या कंपन्यांनी आता किंमतीमध्ये 50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे भारतीय कंपन्यांही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 1 जुलै: भारत आणि चीन (India and China) यांच्यातल्या सीमावादाचा फटका आता औषधांना (Covide-19 Medicine) बसला आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेली औषध भारतीय बंदरांमध्येच (Indian Port) अडकली आहेत. या औषधांसाठी कस्टम्स विभागाने अजुनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही औषधं परवानगीच्या प्रतिक्षेत असून संबंधित कंपन्यांनी औषधाच्या किंमतींमध्ये तब्बल 50 टक्क्यांची वाढ केली आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनेक दिवसानंतरही परवानगी न मिळाल्याने या कंपन्यांनी आता किंमतीमध्ये 50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे भारतीय कंपन्यांही अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक भारतीय कंपन्या या चीनमधूनच आपला कच्चा माल मागवत असतात.

दरम्यान,  जगभरात कोरोनाव्हायरसची (coronavirus) संख्या वाढते आहे. अशात काही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरत आहेत. अशाच औषधांपैकी एक म्हणजे रेमडेसिवीर (Remdesivir). त्यामुळे अमेरिकेनं (America) आता या औषधाचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. ज्यामुळे इतर देशांना पुढील तीन महिने हे औषध मिळणारच नाही.

केंद्राची परवानगी, देशभरात उपलब्ध करणार CORONIL KIT; बाबा रामदेव यांची घोषणा

रेमडेसिवीर हे अँटिव्हायरल औषध आहे. अमेरिकेतल्या गिलियड सायन्स (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध आहे.  इबोलाशी लढण्याासाठी हे औषध वापरण्यात आलं होते. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा केला जातो आहे. यूएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युटमार्फत करण्यात आलेल्या अभ्यासात कोरोना रुग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यानंतर यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाचा कोरोना रुग्णांवर आपात्कालीन उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली.

बापरे! राज्याचा धोका वाढला, 24 तासांत 5537 रुग्णांची वाढ; संख्या गेली 1 लाखांवर

आता अमेरिकेनं या औषधाचा ग्लोबल स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंड ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेजमार्फत 5 लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: July 1, 2020, 9:07 PM IST

ताज्या बातम्या