मराठी बातम्या /बातम्या /देश /

COVID-19: देशात कोरोना रुग्णांनी पार केला 14 लाखांचा टप्पा, तर 32 हजार जणांचा मृत्यू

COVID-19: देशात कोरोना रुग्णांनी पार केला 14 लाखांचा टप्पा, तर 32 हजार जणांचा मृत्यू

10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे 9 लाख 01 हजारांपेक्षा जास्त लोक आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभारात 705 जणांचा मृत्यू झाला.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 26 जुलै: देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येने 14 लाखांचा मोठा टप्पा पार केला आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. Worldometersच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाखांपेक्षा जास्त झाली असून मृत्यूचा आकडा 32 हजार 350 झाला आहे. रविवारी 24 तासांमध्ये 48,661 नवे रुग्ण देशात आढळून आले आहेत.

त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे 9 लाख 01 हजारांपेक्षा जास्त लोक आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभारात 705 जणांचा मृत्यू झाला.  आत्तापर्यंत 8,85,577 रुग्ण बरे झाले आहेत. तर 32,063 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण थोडं वाढलं असून ते 63.91 वर गेलं आहे.

महाराष्ट्रात आज 9 हजार 431 नवीन रुग्ण आढळले (New Corona Patient) आहेत तर 6044 रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. आज 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत आज 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे.

राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा  आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली.

COVID-19: डायबेटिसच्या रुग्णांना जास्त काळजीची गरज, आढळून आलीत 2 नवी लक्षणे

पुण्यात रुग्णसंख्या वाढलेली असतानाचं एक दिलासा देणारी बाबही समोर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 992 नवे रुग्ण आढळून आले. तर 1175 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलं आहे. पुण्यात रविवारी 18 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाच रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

विविध हॉस्पिटल्समध्ये 682 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 105 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 48057 एवढी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 18298 एवढी झालीय.

मुंबईसाठी Good News, ‘कोरोना टेस्ट’साठी सुरू होणार आता हायटेक लॅब

त्यामुळे पुण्यातल्या एकूण रुग्णांची मृत्यू संख्या 1166 एवढी झालीय. तर आत्तापर्यंत तब्बल 28 हजार 593 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी पुण्यात 2506 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती.

First published:

Tags: Coronavirus