नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : देशात रिकव्हरी रेट वाढतो आहे पण त्याच वेगानं कोरोनाची आकडेवारी देखील वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे कोरोनामुळे आधीच हाल झाले असताना आणखीन दयनीय अवस्था आणि भीषण वास्तव दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. अनेक गावांमध्ये आजही रस्त्यांची अवस्था बिकट असल्यानं रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी होणारे कोरोनामुळे होणाऱ्या रुग्णांचे हाल हे खूप वाईट असल्याचं या व्हिडीओमधून समोर आलं आहे.
देशातील कोरोनाव्हायरसची गती आता हळू हळू कमी होत आहे. तसेच यातून सावरणा लोकांची संख्याही वाढत आहे. पण देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जो अति दुर्गम भाग आहे आणि तिथपर्यंत रुग्णसेवा आणि रुग्णवाहिका पोहोचण्यात खूप अडचणी येतात. अशीच एक घटना आसाममध्ये समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोग्य कर्मचारी रात्रीच्या अंधारात कोरोना रुग्णाला त्याच्या खांद्यावर घेऊन जात आहे.
हे वाचा-पॉझिटिव्ह बातमी ! कोरोना आला आणि ‘हा’ जीवघेणा आजार कमी झाला
कोरोनाग्रस्तांना वेळेवर उपचार मिळणं आवश्यक आहे. पण अति दुर्गम भागात जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा ठिकाणहून कोरोनाग्रस्त रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवणं खूप मोठं जोखमीचं काम आहे. मात्र हे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं आहे. आपल्या खांद्यावरून या रुग्णाला रुग्णवाहिकेपर्यंत 500 मीटर अंतर कापून आणलं आणि त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन गेले.
आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून आपल्या खांद्यावर कोरोना रुग्ण घेऊन जात आहेत. ही घटना आसाममधील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता खूप खराब आहे. अशा परिस्थितीत तेथे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. तसेच कोरोना रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक होते. दरम्यान, 108 अॅम्ब्युलन्स सेवेमध्ये काम करणारे गौतम सेकिया याने ही कामगिरी बजावली आहे. सोशल मीडियावर या आरोग्य कर्मचाऱ्याचं खूप कौतुक होत आहे.