कोरोनाचं धुमशान! आणखीन एका राज्यात नाईट कर्फ्यू, मास्क न घालणाऱ्यांसाठी दंड

रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 ते 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 ते 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

  • Share this:
    जयपूर, 22 नोव्हेंबर : कोरोनाचा प्रकोर दिवसेंदिवस वाढत आहे. रिकव्हरी रेट जरी वाढत असला तरीही नवीन कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीतल्या फटकांमुळे वाढलेलं प्रदूषण, थंडी आणि बदलणारं हवामान त्यात होणारा कोरोनाचा कहर ही स्थिती चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. फेब्रुवारीपर्यंत कोरोना आणखीन भयंकर रुप घेईल त्यामुळे सतर्क राहाणं आणि काळजी घेणं गरजेचं असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर काही राज्यांमध्ये वेगानं वाढल्यामुळे पुन्हा एकदा कर्फ्यू आणि दंड अशा दोन पातळीवर प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. दिल्ली, मध्य प्रदेश आणि त्यानंतर आता राजस्थानमध्ये देखील नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त आठ जिल्ह्या - जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर आणि भिलवारा या राज्यांमध्ये जास्तीत जास्त आठ जिल्ह्यांमध्ये 20 डिसेंबरपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 ते 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: