15 August: लाल किल्ल्यावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणारे 350 पोलीस झाले क्वारंटाइन

15 August: लाल किल्ल्यावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणारे 350 पोलीस झाले क्वारंटाइन

या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती हजर राहतात त्यामुळे सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 9 ऑगस्ट: कोरोनाचा प्रकोप सुरुच असल्याने त्याचं सावट 15 ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभावर पडलं आहे. सगळ्या देशाचं लक्षं लाल किल्ल्यावर होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाकडे लागलेलं असतं. या कार्यक्रमात कोरोनामुळे अडथळा येऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणाऱ्या 350 पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आलं आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

या सर्व जवानांना दिल्ली पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या घरांमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यास त्यांना सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती हजर राहतात  त्यामुळे सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

या कार्यक्रमाला शाळकरी मुले उपस्थित राहणार नाहीत. फक्त मोजक्याच निमंत्रितांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान,  सध्या जगात सर्वाधिक जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ऑगस्टमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार आता भारताची चिंता वाढली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा दर वाढतो आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या 8 दिवसात जगातील सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद भारतात झाली आहे.

‘मिशन धारावी’ने करून दाखवलंच, 24 तासांमध्ये आढळले फक्त 5 कोरोना रुग्ण!

भारतात 8 दिवसात एकूण 4.55 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. म्हणजं दररोज सरासरी जवळपास 54 हजार कोरोना रुग्ण सापडले.

31 जुलैला कोरोनाचे एकूण 16.97 लाख रुग्ण होते, 8 ऑगस्टपर्यंत ही संख्या 21.52 लाख झाली. एक ऑगस्टला देशात जवळपास 54 हजार नवीन कोरोना प्रकरणं होती. 8 ऑगस्टला ती 65 हजार पार झाली आणि हा वेग खूपच भयंकर आहे.

जगातील कोरोनाव्हायरसच्या 50% पेक्षा जास्त प्रकरणं फक्त भारत, ब्राझील आणि अमेरिका या तीन देशांमध्येच आहेत. या तुन्ही देशांतील ऑगस्टच्या 8 दिवसांतील नवीन प्रकरणं पाहिली तर भारतात 4.55 लाख, ब्राझीलमध्ये 3.47 लाख आणि अमेरिकेत 4.42 लाख प्रकरणं आहे.

विमान क्रॅश झाल्यानंतरच्या 5 मिनिटांमुळे वाचला  150 प्रवाशांचा जीव

जगाची आकडेवारी पाहता ऑगस्टमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. एक ऑगस्टला 1.77 कोटी रुग्ण होते. 8 ऑगस्टला ही संख्या 1.97 कोटी झाली आहे. म्हणजे जवळपास 2 कोटीपर्यंत पोहोचली.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 9, 2020, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading