मराठी बातम्या /बातम्या /देश /21 वर्षाखालील सज्ञान मुलं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात का? न्यायालयाने सुनावला महत्त्वाचा निर्णय

21 वर्षाखालील सज्ञान मुलं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात का? न्यायालयाने सुनावला महत्त्वाचा निर्णय

21 वर्ष वयाच्या खालील पुरुष लग्न करु शकत नाहीत (Legal Age of Marriage in India). पण सहमतीनं एखाद्या जोडीदाराबरोबर एकत्र राहू शकतात असा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

21 वर्ष वयाच्या खालील पुरुष लग्न करु शकत नाहीत (Legal Age of Marriage in India). पण सहमतीनं एखाद्या जोडीदाराबरोबर एकत्र राहू शकतात असा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

21 वर्ष वयाच्या खालील पुरुष लग्न करु शकत नाहीत (Legal Age of Marriage in India). पण सहमतीनं एखाद्या जोडीदाराबरोबर एकत्र राहू शकतात असा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

    नवी दिल्ली 21 डिसेंबर : देशभरात मुलीच्या लग्नाचं वय आता 21 वर्ष करण्यात येणार आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 21 वर्ष वयाच्या खालील पुरुष लग्न करु शकत नाहीत (Legal Age of Marriage in India). पण सहमतीनं एखाद्या जोडीदाराबरोबर एकत्र राहू शकतात असा महत्त्वाचा निर्णय पंजाब आणि हरियाणा कोर्टानं (Punjab Haryana Court) दिला आहे. याबद्दलचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. अर्थातच आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

    सध्या लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहणं अनेकजण पसंत करतात. याचसंदर्भात मे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला होता. एखादं लग्नाला योग्य वय असलेलं प्रौढ जोडपं परस्पर सहमतीनं एकमेकांसोबत लग्नाशिवाय राहू शकतं असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्याच आधारावर पंजाब-हरियाणा कोर्टानं हा निर्णय दिला आहे. सज्ञान जोडप्याला लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी देणारा हा निर्णय काळानुरुप दिलेला निर्णय मानला जात आहे.

    Voter ID Aadhaar Link:आता आधार मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार,लोकसभेत मंजुरी

    विवाहयोग्य वय म्हणजे 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेला पुरुष 18 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलेबरोबर म्हणजेच सज्ञान महिलेबरोबर तिच्या सहमतीनं लग्नाशिवाय राहू शकतो, असा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात दिला. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील एका जोडप्यानं याबाबतची याचिका केली होती. या दोघांचंही वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. 18 वर्षं म्हणजे आपल्या देशात कायद्याने सज्ञान झाल्याचं मानलं जातं. मात्र लग्न करण्यासाठी पुरुषाला 21 व्या वर्ष वयाआधी हिंदू मॅरेज ॲक्टनुसार परवानगी देण्यात आलेली नाही.

    लग्नाशिवाय संबध ठेवायला या दोघांच्याही कुटुंबीयांकडून विरोध आहे. त्यांना कुटुंबीयांनी धमक्याही दिल्या होत्या. आपले घरचे कदाचित आपल्याला मारून टाकतील अशी भीती आपल्याला वाटते अशी याचिका या जोडप्याने केल्याचं त्यांच्या वकीलांनी सांगितलं. या दोघांनाही संरक्षण देण्याचे आदेश कोर्टानं गुरुदासपूरच्या (Gurudaspur SSP) पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

    तव्यानं गळ्यावर वार करून केली प्रेयसीची हत्या, तीन वर्षांच्या अफेअरचा अंत

    देशातील प्रत्येक नागरिकाचं आयुष्य आणि स्वातंत्र्य याचं संरक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं आपल्या राज्यघटनेत म्हटलं आहे. या प्रकरणातील पुरुष याचिकाकर्त्याचे वय लग्नाला योग्य नाही म्हणून त्याचा भारतीय नागरिक या नात्याने असलेला घटनात्मक अधिकार नाकारणे हे योग्य नाही असं न्यायाधीश हरनरेश सिंग गिल यांनी निकाल देताना म्हटलं आहे.

    अर्थातच या निर्णयाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लिव्ह इन रिलेशनशिप अनेक पालकांना जरी मान्य नसली तरी सध्याच्या तरुणांना लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी हा योग्य पर्याय वाटतो. त्यामुळेच अनेक जोडपी सध्या लिव्ह इनमध्ये राहणं पसंत करतात. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

    First published:
    top videos

      Tags: Haryana, Marriage, Punjab, Relationship