नवी दिल्ली, 3 जून : प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्याला ट्युमर झाला असून उपचार करण्यासाठी त्यांची परदेशात जायची परवानगी द्यावी म्हणून त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ED तर्फे रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जायची आणि विशेषतः लंडनला जायची परवानगी देऊ नये अशी विनंती सक्तवसुली संचालनालयाने (ED) केली होती. अखेर कोर्टाने वाड्रा यांना नेदरलँड्स किंवा अमेरिकेत जायची परवानगी दिली आहे. पण ते लंडनला जाऊ शकत नाहीत, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
मोठ्या आतड्यात ट्युमर झाला असून त्याच्या उपचारासाठी सहा आठवड्यांसाठी हॉलंड किंवा अमेरिकेत ते जाऊ शकतात, असा निर्णय दिल्लीच्या कोर्टाने दिला आहे. आपल्या मोठ्या आतड्यात ट्यूमर झाला आहे. त्याच्या इलाजासाठी आणि सेकंड ओपिनियन घेण्यासाठी ब्रिटन आणि इतर देशांत जायची परवानगी द्यावी अशी विनंती रॉबर्ट वाड्रा यांनी वकील के. टी. एस. तुलसी यांच्या मार्फत केली होती. वकिलांनी वाड्रा यांचे मेडिकल रिपोर्ट न्यायालयाला सादर केले आणि सेकंड ओपिनियनसाठी त्यांना लंडनला जायची परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली.
मोदींच्या जेम्स बॉण्डची ताकद आणखी वाढली; दिला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा!
रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी अंतिम टप्प्यावर आहे. त्यांना कदाचित ताब्यात घेऊन चौकशी करण्याची वेळ येऊ शकते. कारण त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, असं ED तर्फे सांगण्यात आलं. वाड्रा त्याच देशात जाऊ इच्छितात, जिथे त्यांनी काळा पैसा लपवलेला आहे. ते कदाचित देश सोडून जाऊ शकतील, असं ईडीने कोर्टापुढे सांगितलं.
चौकशी टाळण्यासाठी वाड्रा देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तशी परवानगी देऊ नये, अशी विनंती ED ने न्यायालयाला केली होती.
VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी
दोन्ही बाजूंचं ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी रॉबर्ट वाड्रांना ब्रिटनला जायची परवानगी नाकारली. पण ते अमेरिकेत आणि नेदरलँड्सला जाऊ शकतात.
SPECIAL REPORT : युतीचा फॉर्म्युला ठरला, लहान आणि मोठा भाऊ कोण?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Enforcement Directorate, Priyanka gandhi, Robert vadra