काय आहे प्रकरण
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे धर्मसंसद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेवटच्या दिवशी स्वतःला संत म्हणवणाऱ्या कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या नथुराम गोडसेची भलामण केली होती. नथुराम गोडसे यांनी योग्य काम केलं असं म्हणत त्यांचे आपण आभार मानायला हवेत, अशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं.. कालीचरणचे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाला कालीचरण
इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर कब्जा करणं आहे. 1947 मध्ये आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी कब्जा केला होता, असं तो म्हणाले. आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतलं. राजकारणाच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केलं. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो, असे वादग्रस्त वक्तव्य त्याने केलं होतं.
हे वाचा -
दोन दिवसांची पोलीस कोठडी
कालीचरणची चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. ती मागणी मान्य करत न्यायालयाने कालीचरणला पुढचे 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Mahatma gandhi, Police