Elec-widget

कर्जबुडवा विजय मल्ल्या हा फरारच, कोर्टाचा मोठा निर्णय

कर्जबुडवा विजय मल्ल्या हा फरारच, कोर्टाचा मोठा निर्णय

कोर्टाच्या या आदेशामुळे विजय मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणता येणार आहे. वरच्या कोर्टात अपील करता यावं यासाठी कोर्टानं आपल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती विजय मल्ल्याने केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जानेवारी :  कर्जबुडवा उद्योगपती विजय माल्ल्या याला विशेष पीएमएलए कोर्टाने फरार घोषित केलं आहे. तसंच मल्ल्या हा आर्थिक गुन्हेगार असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे.

कोर्टाच्या या आदेशामुळे विजय मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणता येणार आहे. वरच्या कोर्टात अपील करता यावं यासाठी कोर्टानं आपल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती विजय मल्ल्याने केली होती. पण मल्ल्याची ही विनंती कोर्टाने फेटाळली आहे.

काय आहे मल्ल्या प्रकरण?

देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती.

भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर येवढं राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे.

Loading...

मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.

या आधी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातल्या भांडणामुळे त्या दोघांनाही केंद्र सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी' हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.

काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.




VIDEO: मराठी माणूस लवकरच होणार पंतप्रधान : मुख्यमंत्री


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...