‘गर्भ संस्कारा’वर सुरु होणार अभ्यासक्रम, भावी मातांना प्रशिक्षित करण्यासाठी उचललं पाऊल

‘गर्भ संस्कारा’वर सुरु होणार अभ्यासक्रम, भावी मातांना प्रशिक्षित करण्यासाठी उचललं पाऊल

गर्भ संस्काराचा कोर्स सुरू करण्यासाठी राज्यपालांनी महाभारतातील आईच्या गर्भात युद्ध कौशल्य मिळविलेल्या अभिमन्यूचा संदर्भ दिला

  • Share this:

लखनऊ, 23 फेब्रुवारी : लखनऊ विश्वविद्यालयात (Lucknow University) नव्या शैक्षणिक वर्षापासून गर्भ संस्कार (Pregnancy Courses) यावर सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स सुरू होणार आहे. अशा पद्धतीने अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत गर्भवती महिलांनी काय परिधान करायला हवं, काय खावं, कशी वागणूक ठेवावी, स्वत:ला कसं फिट ठेवावं आणि गर्भावस्थेत असताना कोणत्या प्रकारचे संगीत ऐकावे याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या कोर्सअंतर्गत महिलांना मातृत्वाचे शिक्षण देण्यात येणार. ANI या वृत्तसंस्थेनुसार या अभ्यासक्रमातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

राज्यपाल आनंदी बाई पटेल यांनी ठेवला प्रस्ताव

विद्यालयानुसार पुरुष विद्यार्थीदेखील गर्भ संस्काराच्या अभ्यासक्रमाचा पर्य़ाय निवडू शकतात. लखनऊ विद्यापीठाचे प्रवक्ता दुर्गेश श्रीवास्तव यांनी एएनआयला सांगितले की, राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी तरुणींना त्यांच्या भावी मातेच्या भूमिकेचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. गेल्या वर्षी या विद्यालयातील दीक्षांत समारोहादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपालांनी महाभारतातील अभिमन्यूचा संदर्भ दिला होता. ज्याने आपल्या आईच्या गर्भात युद्ध कौशल्य प्राप्त केले. त्यांनी असाही दावा केला आहे की, जर्मनीत एक संस्था आहे, जेथे या प्रकारचा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

दुर्गेश श्रीवास्तव यांनी सांगितले की या अभ्यासक्रमात दिशा-निर्देश तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 16 संस्कारांबाबत माहिती देण्यात येईल. हा कोर्स मुख्यत: परिवार नियोजन आणि गर्भवती महिलांच्या पोषणाविषयी माहिती देणारा असेल. या नव्या अभ्यासक्रमाअंतर्गत विविध कार्यशाळादेखील आयोजित करण्यात येतील.

हेही वाचा -आज अकोले बंद! इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ वारकरी संप्रदाय एकवटला

डॉक्टरांनी व्यक्त केला आनंद

स्त्री रोग तज्ज्ञांनी लखनऊ विद्यालयाद्वारे या अभ्यासक्रमाची सुरुवात केल्याबद्दल स्वागत केले. एका विद्यार्थ्याने सांगितले, अभ्यासक्रम वास्तवात चांगला आहे आणि आम्ही याचे स्वागत करतो. हा एक संवेदनशील मुद्दा आहे. जर विद्यार्थ्यांना मातृत्वाबाबत प्रशिक्षित केले तर भविष्यात दांम्पत्याला स्वस्थ मुलं जन्माला घालण्यासाठी मदत मिळेल. यामुळे आपला देशाच्या भविष्याचे स्वास्थ चांगले राहिलं. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मधू गुप्ता म्हणाल्या या  अभ्यासक्रमाची महिला आणि बाल कल्याण कार्यक्रमांना मदत होईल.

First published: February 23, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या