• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 14 वर्षांच्या मुलीनं हुशारी दाखवत थांबवलं स्वतःचं लग्न, रागावलेल्या कुटुंबीयांनी केलं बहिष्कृत

14 वर्षांच्या मुलीनं हुशारी दाखवत थांबवलं स्वतःचं लग्न, रागावलेल्या कुटुंबीयांनी केलं बहिष्कृत

एका 14 वर्षांच्या अल्पवयीन (Courageous minor girl stopped her own marriage) मुलीनं हुशारी दाखवत स्वतःचं होऊ घातलेलं लग्न थांबवल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

 • Share this:
  जोधपूर, 23 नोव्हेंबर: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन (Courageous minor girl stopped her own marriage) मुलीनं हुशारी दाखवत स्वतःचं होऊ घातलेलं लग्न थांबवल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या मुलीचं तिच्या कुटुंबीयांनी (Forceful marriage) जबरदस्तीनं लग्न ठऱवलं होतं. मात्र तिला हे लग्न करण्याची मुळीच इच्छा नव्हती. मुलीचे शक्कल लढवत आपल्या लग्नाची (Child protection rights commission) पत्रिकाच बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पाठवली. त्यांनी प्रकरणाची दखल घेत पोलिसांना पाचारण केल्यामुळे हे लग्न रोखण्यात यश आलं. अल्पवयीन मुलीचं लग्न राजस्थानच्या उदयपूर परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षांच्या मुलीचं तिच्या कुटुंबीयांनी लग्न ठरवलं होतं. मुलीच्या काकाचं लग्न होत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. घरातील लहान मुलीचं लग्न लावल्यावर मोठ्या माणसांची लग्न होतात, या अंधश्रद्धेतून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुलीला शिकण्याची इच्छा होती आणि हे लग्न करायचं नव्हतं. त्यासाठी तिने बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष संगीता बेनिवाल यांना व्हॉट्सअपवरून आपल्या लग्नाची पत्रिका पाठवली आणि हे लग्न थांबवण्याची विनंती केली. बेनिवाल यांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधत हे लग्न थांबवलं. घरच्यांचा आकांडतांडव हे लग्न रद्द करून जेव्हा बेनिवाल या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सोडण्यासाठी गेल्या तेव्हा कुटुंबीयांनी तिला घरात घ्यायला नकार दिला. तिच्या आईपासून सगळेच तिच्यावर कमालीचे संतापले होते आणि घराण्याच्या परंपरेला तिनं नख लावल्याचे बोल लावत होते. जन्मदात्या आईनेच आपली मुलगी आपल्यासाठी मेली, असे उद्गार काढले. आपल्या समाजात याच वयात लग्न करण्याची पद्धत असून त्याला विरोध केल्यामुळे समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल, असा इशाराही आईने मुलीला दिला. तुला आम्ही स्विकारलं, तर आमच्यावरही समाज बहिष्कार टाकेल, असं म्हणत तिला घरी घ्यायला नकार दिला. हे वाचा- जगातील फक्त दोनच देशांत विकला जात नाही Coca Cola, कारणं आहेत रोमांचक बालिकागृहात रवानगी मुलीचे कुटुंबीय तिचा स्विकार करत नसल्याचं लक्षात आल्यावर मुलीला बालिकागृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलीच्या सुरक्षेचा विचार करता हाच निर्णय़ योग्य असल्याचं शासनाला वाटल्यामुळे मुलीची रवानगी बालिकागृहात करण्यात आली आहे. या घटनेच्या निमित्ताने अजूनही अघोरी परंपरा आणि अंधश्रद्धा कशा मूळ धरून आहेत, याची प्रचिती आली आहे.
  Published by:desk news
  First published: