मराठी बातम्या /बातम्या /देश /चिमुरडा सोनू सूद सोशल मीडियावर VIRAL! अभिनेत्याच्या कामामुळे त्याच्या आईवडिलांनी घेतला असा निर्णय

चिमुरडा सोनू सूद सोशल मीडियावर VIRAL! अभिनेत्याच्या कामामुळे त्याच्या आईवडिलांनी घेतला असा निर्णय

कोरोना काळात लाखो लोक बेरोजगार झाले. या दरम्यान हजारो मजुर पायी आपल्या गावी निघाले. तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद पुढं आला होता. सोनू सूदच्या कामामुळे अनेकजण प्रेरित झाले आहेत.

कोरोना काळात लाखो लोक बेरोजगार झाले. या दरम्यान हजारो मजुर पायी आपल्या गावी निघाले. तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद पुढं आला होता. सोनू सूदच्या कामामुळे अनेकजण प्रेरित झाले आहेत.

कोरोना काळात लाखो लोक बेरोजगार झाले. या दरम्यान हजारो मजुर पायी आपल्या गावी निघाले. तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद पुढं आला होता. सोनू सूदच्या कामामुळे अनेकजण प्रेरित झाले आहेत.

खम्मम, 05 फेब्रुवारी: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona Virus Pandemic) देशावर कोसळलेल्या आपत्तीचा मोठा फटका सर्वसामान्य गरीब जनतेला बसला. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात मार्चपासून लॉकडाउन करण्यात आला. चार ते सहा महिने हा लॉकडाउन सुरू होता. या काळात लाखो लोक बेरोजगार झाले. काम नाही, पैसा नाही, खायचं काय, रहायचं कुठं अशी अवस्था झालेले हजारो मजुर पायी आपल्या गावी निघाले. तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद पुढं आला. या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सोनू सूदनं बसगाड्यांची व्यवस्था केली. त्यांना अन्न, पाणी, पैसे यासह वैदयकीय मदत केली. कोरोना काळात तो मजुरांसाठी देवदूत ठरला होता.

आजही त्याचं मदतकार्य सुरू आहे. या काळात त्यानं सुरू केलेली हेल्पलाइन अजूनही सुरू असून, लॉकडाउनमध्ये नोकऱ्या गमावलेले, मजूर तसंच गरजवंतांसाठी त्यानं आता ‘खुद कमाओ घर चलाओ’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तो गरजवंतांना ई-रिक्षा भेट देत आहे. सोनू सूदच्या या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघानंदेखील (United Nations) घेतली असून, त्याला विशेष ह्युमनटेरियन पुरस्कारानं (Humanitarian Award) सन्मानित करण्यात आले आहे.

(हे वाचा-रात्रीच्या काळोखात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, विरोध करताच उचललं हे पाऊल)

त्याच्या या कामानं सर्वसामान्य जनतेला इतकं प्रभावित केलं आहे की तेलंगणामधील (Telangana) खम्मम जिल्ह्यातील (Khammam) एका जोडप्यानं आपल्या मुलाचं नाव सोनू सूद ठेवलं आहे. खम्मम जिल्ह्यातील बोनाकल मंडलातील मस्तिकुंटा (Mustikunta)  गावच्या पंडागा नवीन कुमार आणि त्रिवेणी या जोडप्यानं लॉकडाउनच्या काळात जन्मलेल्या आपल्या मुलाचं सोनू सूद ठेवलं आहे. लहान बाळाला पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा अन्न भरवलं जातं तेव्हा एक विशेष समारंभ आयोजित केला जातो. या बाळाचाही अन्नप्राशन समारंभ मस्तिकुंटा इथल्या या कुटुंबाच्या घरी झाला. या समारंभाचे आमंत्रण त्याच्या आजी-आजोबांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यातील या बाळाच्या नावानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. सोनू सूदप्रमाणेच आपला मुलगा मोठा झाल्यावर मानवतावादी होईल अशी या जोडप्याला आशा आहे.

(हे वाचा-गर्लफ्रेंड बनून बायकोनंच भेटायला बोलावलं; भररस्त्यात आंबटशौकिन नवऱ्याला धुतलं)

आपल्या दमदार अभिनयानं सर्वांना जिंकणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं कोरोना संकटाच्या काळात केलेल्या निरपेक्ष सेवा कार्यानं सर्वांच्या मनात आदराचं स्थान प्राप्त केलं आहे. त्याच्या दानशूर स्वभावानं सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळं आम्ही आमच्या मुलाचं नाव सोनू सूद ठेवण्याचा निर्णय घेतला. सोनू सूदनं आपल्या मुलाला आशीर्वाद द्यावा यासाठी ट्विटरवर त्याला एक संदेशही पाठविला असल्याचं या जोडप्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

First published:

Tags: Lockdown, Sonu Sood