Lockdown मध्ये लपून भेटणं महागात पडलं, गावकऱ्यांनी थेट बोहल्यावर चढवलं

Lockdown मध्ये लपून भेटणं महागात पडलं, गावकऱ्यांनी थेट बोहल्यावर चढवलं

लॉकडाऊनच्या काळात लपून छपून भेटणाऱ्या प्रेमी युगुलाला गावकऱ्यांनी पकडून थेट लग्न लावून दिलं.

  • Share this:

पटना, 02 मे : लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका जोडप्याला महागात पडलं आहे. लोकांना ते दोघे भेटताना सापडले त्यानंतर दोघांचेही एका मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. कोरोना व्हायरसच्या वाढतं संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही तरुण आणि तरुणी भेटत होते. गावकऱ्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत त्यांचे लग्न लावून दिलं.

बिहारमधील बेगुसराय इथे ही घटना घडली आहे. कोठीयारा गावातील ललित कुमार याचे गावातीलच राणी हिच्यावर प्रेम होते. गेल्या एक वर्षांपासून प्रेम प्रकऱण सुरू होतं. पान दुकान चालवणारा ललित राणीला भेटायला जात होता. मात्र दोघे भेटत असल्याची माहिती गावकऱ्यांनी समजली.  तेव्हा गावातील प्रमुखांनी पंचायत बोलावून दोघाच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केलं.

हे वाचा : कोरोनामुळे लग्न पुढे ढकललं, महाराष्ट्रातील IFS अधिकाऱ्याची CM रिलिफ फंडात मदत

गावातील एका शिव मंदिरात ललित आणि राणी यांचे लग्न झाले. यावेळी गावकऱी उपस्थित होते. लग्नात नवरा नवरीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. दोघेही मास्क लावून बोहल्यावर चढले. गावातील एका नेत्यानं सांगितलं की, दोघांनाही भेटताना गावकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आलं.

पाहा VIDEO : 'रामायण' मालिकेनं रचला जागतिक इतिहास, दूरदर्शननं मानले प्रेक्षकांचे आभार

First published: May 2, 2020, 7:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या