• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कशातली फक्त अग्नी पेटवून सप्तपदी केली म्हणजे लग्न वैध होत नाही; कोर्टाने कपलला फटकारलं

कशातली फक्त अग्नी पेटवून सप्तपदी केली म्हणजे लग्न वैध होत नाही; कोर्टाने कपलला फटकारलं

लग्न केल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी करणाऱ्या कपलला कोर्टाचा दणका.

 • Share this:
  चंदीगड, 12 ऑक्टोबर : प्रेम केल्यानंतर कितीतरी कपलच्या (Couple) घरातून त्यांच्या लग्नाला मान्यता मिळत नाही. असे कपल कुटुंबाचा विरोध झुगारत पळून जात कुटुंबाच्या संमतीशिवाय लग्न करतात (Wedding). एखाद्या ठिकाणी जाऊन एकमेकांच्या गळ्यात हार घालतात, अग्नीभोवती सात फेरे घेतात आणि मुलगा मुलीच्या कपाळात सिंदूरही भरतो. असंच लग्न (Marriage) केल्याचा दावा करणाऱ्या एका कपलला कोर्टाने फटकारलं आहे. त्यांचं लग्न वैध नसल्याचं म्हणत कोर्टाने त्यांना  25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने एका कपलच्या संरक्षण याचिकेवर सुनावणी केली. 26 सप्टेंबर, 2021 ला कुटुंबाच्या विरोधात जाऊन घरातून पळून लग्न केल्याचा दावा करत या कपलने आपल्या सुरक्षेसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मुलीच्या नातेवाईकांकडून आपल्याला धोका असल्याचं सांगत या कपलने सुरक्षेची मागणी करणारी याचिका कोर्टात केली. त्यांनी याचिका करताना कोणतंही विवाह प्रमाणपत्र दिलेलं नाही नाही किंवा लग्नाचा कोणताही फोटो दिलेला नाही. हे वाचा - लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम आणि 7 कोटींचे मालक बनले लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार कोर्टाने त्यांना लग्नासंबंधी दस्तावेज देण्यासाठी वेळ दिला. पण कपलने आपण एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथंच लग्न केल्याचं सांगितलं. मुलानं मुलीला सिंदूर लावलं, एकमेकांना वरमाला घातल्या आणि एका भांड्यात अग्नी पेटवून त्याभोवती सप्तपदी घेतली असं या याचिकेत सांगण्यात आलं आहे. पण सप्तपदीवेळी कोणत्याही मंत्रांचं उच्चारण झालं नाही असंही सांगितलं. पण फक्त कशात अग्नी पेटवून सप्तपदी घेणं म्हणजे वैध लग्न नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. शिवाय लग्नाचा दावा करणाऱ्या या कपलमध्ये मुलीचं वय 20 वर्षे आहे तर मुलाचं वय 19 वर्षे 5 महिने. मुलगा लग्नाच्या वयाचा नाही. या दोघांचं कायदेशीर लग्न झालेलं नाही हे लपवण्याचा प्रयत्न होतो आहे. लग्न केलं असं सांगून याचिकाकर्ते कोर्टाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं कोर्टाने म्हटलं. त्यामुळे 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे वाचा - ...तर कंडोमशिवाय लैंगिक संबंध गुन्हा; तुमची छोटीशी चूक पडणार महागात पण या कपलच्या सुरक्षेच्या मागणीबाबत विचार करावा, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून धोका आहे का हे तपासावं आणि तसं असल्याचं त्यांना सुरक्षा द्यावी, असे निर्देश कोर्टाने पंचकुला पोलिसांना दिले आहेत. 
  Published by:Priya Lad
  First published: