धावत्या बाईकवर KISS करत होतं कपल; IPSनं शेअर केला व्हिडीओ

धावत्या बाईकवर KISS करत होतं कपल; IPSनं शेअर केला व्हिडीओ

धावत्या बाईकवर कपल KISS करतानाचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : देशाच्या राजधानीतील एका व्हायरल व्हिडीओची सर्वत्र जोरात चर्चा आहे. नेटीझन्स  यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. IPSनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक कपल धावत्या बाईकवर चक्क KISS करताना दिसत आहेत. प्रेमी युगुलांचा हा व्हिडीओ IPSनं आपल्या ट्विटर अकांऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बाईकवरील जोडी KISS करताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ राजोरी गार्डन परिसरातील असल्याचं IPSचं म्हणणं आहे. या व्हिडीओमध्ये एक कपल बाईकवरून प्रवास करत आहे. त्यावेळी मुलगी बाईकच्या टाकीवर बसून मुलाला मिठी मारत आहे. शिवाय, KISS देखील करताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर आता अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Need for new sections for #MV Act violations!! #Rajouri garden crossing. pic.twitter.com/0gn7LsIIYM

— HGS Dhaliwal IPS (@hgsdhaliwalips) May 2, 2019

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना काही लोकांनी यांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

It's just shameful.

We should gave them a lesson.

— Sahil Sharma (@Sahil_sharma33) May 3, 2019

तर एका युजर्सनं लव्ह अॅक्टची गरज असल्याचं म्हटलं आहे.

I am shocked to see that how this guy is even able to focus on driving properly.

— Bhavesh Singh (@BhaveshJmd) May 3, 2019

ट्विट केल्यानंतर IPSनं मोटार वाहन कायद्यामध्ये एका नव्या कलमाची गरज असल्याचं म्हटलं आहे. IPSनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला. या व्हिडीओमध्ये गाडीचा नंबर किंवा मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याचं देखील दिसून येत आहे. पोलिसांनी या व्हिडीओबाबत तपास देखील सुरू केला आहे.

VIRAL VIDEO: 3 भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून चिमुकल्याच्या सुटकेचा थरार

First published: May 4, 2019, 11:31 AM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading