गावा-शहरात या एकाच लग्नाची चर्चा; संविधानाच्या साक्षीनं केलं लग्न

गावा-शहरात या एकाच लग्नाची चर्चा; संविधानाच्या साक्षीनं केलं लग्न

देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने एकमेकांचे होण्यासाठी सात फेरे घेतले जातात. पण या दोघांनी मात्र असं काही केलं नाही. त्यांनी संविधानाची शपथ घेऊन लग्न केलं.

  • Share this:

सीहोर, 17 फेब्रुवारी : वेगवेगळ्या हटके पद्धतीने लग्नसोहळे करणारे तरुण हल्ली बरेच दिसतात. शानदार चकचकीत सोहळेही होतात. कुणी आकाशात लग्नगाठ बांधतात तर कोणी पाण्यात. देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने एकमेकांचं होण्यासाठी सात फेरे घेतले जातात. पण या दोघांनी मात्र असं काही केलं नाही. त्यांनी संविधानाची शपथ घेऊन लग्न केलं. मध्य प्रदेशातल्या सीहोरमध्ये झालेल्या या लग्नाची चर्चा सगळीकडे कौतुकाने होते आहे.

सीहोर शहरातल्या विष्णुप्रसाद दोहरे यांचा मुलगा हेमंत आणि जयराम भास्कर यांची मुलगी मधू यांनी अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचं ठरवलं. लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक असलेली राज्यघटना केंद्रस्थानी ठेवून संविधानाच्याच साक्षीने विवाह केला.

हेमंत आणि मधू यांच्या लग्नपत्रिकेपासूनच त्यांच्या विवाह सोहळ्याचं वेगळेपण पाहायला मिळालं. पत्रिकेवर बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा छापलेली होती. प्रत्यक्ष लग्नसोहळ्यात नेहमीच्या परंपरांना फाटा देण्यात आला. त्याऐवजी घटनेची प्रस्तावना (Preamble ) वाचून दाखवण्यात आली. त्यानुसारच पती-पत्नी म्हणून एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दोघांनी घेतली.  भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने झालेल्या लग्नाची चर्चा शहरातच नाही, तर सगळीकडे होत होती. वधू-वर एकमेकांना हार घालत होते तेव्हा घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली जात होती. लग्न सोहळ्याच्या मंचावर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या.

अन्य बातम्या

निर्भया गॅंगरेप: चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावणार

गोडसेना बंदूक पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता, भाजप खासदाराचा मोठा खुलासा

लष्करातल्या महिलांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, केंद्राला फटकारलं

मुलीच्या लग्नाचं PM मोदींना दिलं निमंत्रण, आशीर्वाद म्हणून रिक्षा चालकाला मिळालं

First published: February 17, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या