मराठी बातम्या /बातम्या /देश /

नवऱ्या मुलीला झाला कोरोना, PPE कीट घालून कोव्हिड सेंटरमध्ये केली सप्तपदी, पाहा VIDEO

नवऱ्या मुलीला झाला कोरोना, PPE कीट घालून कोव्हिड सेंटरमध्ये केली सप्तपदी, पाहा VIDEO

या लग्नात पुजाऱ्याव्यतिरिक्त एकच व्यक्ती उपस्थित आहे. विवाह सोहळ्यात कोव्हिड -19 नियमाचं पालन करून हा सोहळा संपन्न झाला.

  • Published by:  Kranti Kanetkar
जयपूर, 07 डिसेंबर: कोरोनामुळे सर्वांना घरात बंद राहावं लागत आहे. अनेक जणांची लग्न खोळंबली तर काही ठिकाणी लग्नमंडपात कोरोनाची लागण झाल्यामुळे सप्तपदी राहिली. पण एका जोडप्यानं कोरोना झाल्यानंतरही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि PPE सूट घालून संपूर्ण विधी केले आहेत. या जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ IAS अधिकाऱ्यानं शेअर केला आहे. राजस्थानच्या बारणमधील केळवारा कोविड सेंटर येथे PPE किटमध्ये एका जोडप्याने लग्न केले. लग्नाच्या दिवशीच वधू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं PPE सूट घालून लग्नाचे सात फेरे घेत एकमेकांना सहजीवनाचं वचन देण्यात आलं. या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या लग्नात पुजाऱ्याव्यतिरिक्त एकच व्यक्ती उपस्थित आहे. विवाह सोहळ्यात कोव्हिड -19 नियमाचं पालन करून हा सोहळा संपन्न झाला. लग्नाचे विधी सगळे विधी PPE सूटवर करण्यात आले आहेत. या व्हिडीओवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत. लोकांनी हे लग्न चंद्रावर होत असल्याचा फिल येत असल्याच्या देखील कमेंट्स केल्या आहेत तर एका युझरनं सिंगल मरायचं नाही म्हणून हा खटाटोप असाही उल्लेख कमेंटमध्ये केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 13 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये वेगवेगळे जुगाड करून लग्न पार पडल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. कधी सोशल डिस्टन्सिंग राखून तर कधी काठीने वधू-वर गळ्यात हार घालताना असे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. मात्र कोव्हिड सेंटरमधील हा लग्न सोहळा खूपच चर्चेचा विषय बनला आहे.
First published:

पुढील बातम्या