रीवा, 24 जून: एका बसमध्ये प्रेमीयुगुल आक्षेपार्ह स्थितीत (couple found in Obscene situation) आढळल्यानं पोलिसांनी (Police) त्यांना अर्धनग्न अवस्थेतच (half naked) पोलीस ठाण्यात नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संबंधित जोडपं आक्षेपार्ह स्थितीत आढळल्यानं पोलिसांनी त्यांना सुरुवातीला शिवीगाळ (Abuse) केली. त्यानंतर त्यांना त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात नेलं आहे. विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान संबंधित पोलीस पथकासोबत महिला पोलीस कर्मचारी देखील नव्हती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतं असून अनेकांनी पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला आहे.
ASP मऊगंज विजय डाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं दावा केला आहे की, ती रीवाकडून हनुमनाच्या दिशेने गावी जात होती. रात्र झाल्यानंतर शाहपुर पोलीस ठाणे हद्दीतील भागात बस स्टँडमध्ये आपल्या प्रियकरासोबत थांबली होती. यानंतर प्रियकराने एका बसमधील स्टाफला याबद्दल विचारलं. रात्र झाल्या कारणाने आजची रात्र बसमध्ये झोपू शकतो का? असं प्रेमी युगूलाने स्टाफला विचारलं. तरुणीच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर बस स्टाफने याची परवानगी दिली. यानंतर प्रेयसी-प्रियकर बसमध्येच झोपले.
दरम्यान एका अन्य स्टाफने या बाबत मालकाला माहिती दिली, यानंतर नगर सैनिकासोबत पोहोचलेले 100 च्या जवानाने तरुणीसोबत गैरव्यवहार केला. अपशब्द उच्चारत तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. इतकच नाही, पीडितेला संपूर्ण कपडेदेखील घालू दिले नाहीत. यानंतर पोलिसांनी चक्क तरुणीला त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रताप केला आहे.
हेही वाचा-एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा; 16 वर्षाच्या भाचीला विकणाऱ्या बारबालाला अटक
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी पोलिसांच्या अमानुष कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. संबंधित पोलीस पथकासोबत कारवाई दरम्यान महिला पोलीस कर्मचारी नसताना पोलिसांनी पीडित तरुणीला अमानुष वागणूक दिली आहे. तिला अर्धनग्न अवस्थेत पोलीस ठाण्यात नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनं संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh