Home /News /national /

अजब प्रेम की गजब कहानी! नवरा-नवरीने हातात 7 महिन्याचं बाळ घेऊन पूर्ण केले लग्नाचे विधी

अजब प्रेम की गजब कहानी! नवरा-नवरीने हातात 7 महिन्याचं बाळ घेऊन पूर्ण केले लग्नाचे विधी

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि आपल्या देशात होणाऱ्या लग्नांमध्ये अनेक किस्से घडत असतात. कुंभारटोला या गावातही एक लग्न पार पडत होतं. नवरा-नवरीबरोबर चक्क त्यांचं सात महिन्यांचं बाळही लग्नांच्या सर्व विधींना उपस्थित होतं.

    सुनील उपाध्याय, छतरपूर, 13 फेब्रुवारी : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि आपल्या देशात होणाऱ्या लग्नांमध्ये अनेक किस्से घडत असतात. कुंभारटोला या गावातही एक लग्न पार पडत होतं. नवरा-नवरीबरोबर चक्क त्यांचं सात महिन्यांचं बाळही लग्नांच्या सर्व विधींना उपस्थित होतं. मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यामध्ये पार पडलेलं हे लग्न गावागावांत चर्चेचा विषय ठरलं. कामानिमित्त दिल्लीला राहणाऱ्या करण अहिरवार याचे गावातील नेहा कश्यप या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांची जात वेगळी असल्यामुळे मुलीच्या पालकांनी त्यांचं नातं नाकारलं होतं. एकमेकांवर जीवापाड प्रेम असणाऱ्या नेहा-करणने 17 फेब्रुवारी 2018 मध्ये घरातून पळून जाऊन दिल्ली गाठली. दिल्लीमध्येच त्यांनी आर्य समाजमंदिरात आंतरजातीय विवाह केला. गेल्यावर्षी 22 जून रोजी दोघांनीही एका बाळाला जन्म दिला, जे आता 7 महिन्यांचं आहे. आई-वडिलांनी पुन्हा एकदा त्यांचा विवाह करुन देण्याचं निश्चित केलं. त्यामुळे यावेळी त्यांनी देवाब्राह्मणांच्या आणि आपल्या बाळाच्या साक्षीने दोघांनीही लग्नाचे राहिलेले विधी पूर्ण केले. (हेही वाचा- 'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं) करणची आई मालती आणि वडील यांनी करण-नेहाचं नातं दोन वर्षानंतर मान्य केलं. त्यामुळे आपल्या मुलाचं लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावं आणि नातवाचीही ओळख गावकऱ्यांना व्हावी याकरता त्यांनी समारंभ आयोजित केला. पत्रिका छापून, गावात घोषणा करुन त्यांनी पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाचे विधी उरकले. या विधींना नवरा-बायकोच्या हातात 7 महिन्यांचं बाळ असल्याने हे लग्न गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलं. (हेही वाचा-या 7 रोमँटिक Kiss चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा इथे)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या