Home /News /national /

'एकतर नातवंड द्या, नाहीतर 5 कोटी द्या'; जोडप्याने मुलगा आणि सुनेविरोधात घेतली न्यायालयात धाव

'एकतर नातवंड द्या, नाहीतर 5 कोटी द्या'; जोडप्याने मुलगा आणि सुनेविरोधात घेतली न्यायालयात धाव

या जोडप्याने त्यांचा मुलगा आणि सून यांच्याकडून नातवाची किंवा नातीची मागणी केली आहे, तसंच ही मागणी पूर्ण न केल्यास त्यांनी प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे

    हरिद्वार 12 मे : उत्तराखंडमधून एक अनोखं प्रकरण (Weird Case) समोर आलं आहे. यात एका जोडप्याने आपला मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही सामान्य बातमी वाटत असली तरी ही बाब नक्कीच थोडी आगळीवेगळी आहे. या जोडप्याने त्यांचा मुलगा आणि सून यांच्याकडून नातवाची किंवा नातीची मागणी केली आहे, तसंच ही मागणी पूर्ण न केल्यास त्यांनी प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे (Grandchild in a Year or Rs 5 Crore Compensation). या संदर्भात हरिद्वारच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून, त्याची पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. Love Marriage ला विरोध करत स्वत:च्याच मुलीचे शत्रू बनले कुटुंबीय, संतापातून झाडली गोळी मिळालेल्या माहितीनुसार, खटला दाखल करणारे संजीव रंजन प्रसाद भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर ते पत्नीसोबत राहतात. त्यांनी 2016 मध्ये आपल्या मुलाचं लग्न नोएडा येथील एका मुलीशी लावून दिलं. त्यांचा मुलगा पायलट आहे आणि सूनही नोकरीला आहे. संजीवचे वकील ए.के.श्रीवास्तव म्हणाले की, हे प्रकरण समाजाचं सत्य दर्शवतं. लोक आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. अशात आपल्या पायावर उभं राहिल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या मूलभूत सुविधांची काळजी घेणं ही मुलांची जबाबदारी आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी त्यांच्या सुनेला एका वर्षात नातू किंवा नातवंड देण्यास सांगितलं आहे, तसं न झाल्यास नुकसानभरपाई म्हणून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पोटच्या लेकराला 2 वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं; बाहेर येताच श्वानांप्रमाणे वागू लागला मुलगा, पुण्यातील संतापजनक घटना संजीव सांगतात की, माझ्या मुलाला अमेरिकेत शिक्षण मिळावं यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं. बँकेकडून कर्ज घेऊन आपलं घर बांधलं. आता मला आर्थिक आणि वैयक्तिक संकटांनी घेरलं आहे. मुलाच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत, लवकरच आम्हाला आमच्या नातवाचा किंवा नातीचा चेहरा दिसेल, अशी आशा होती. पण तसं झालं नाही. नातू असो की नात, आम्हाला याचा फरक पडत नाही. आम्हाला फक्त आमच्या कुटुंबात मुल हवं आहे. जर ते आम्हाला नातू किंवा नात देऊ शकले नाहीत तर मुलगा आणि सून यांच्याकडून आम्ही 5 कोटीची भरपाई मागितली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Small baby, Small child, Uttarakhand, Viral news

    पुढील बातम्या