News18 Lokmat

अण्णा द्रमुकचे उमदेवार पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांचा राडा, मतमोजणी काही काळ थांबली

मतमोजणी दरम्यान जयललितांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन अपक्ष म्हणून उभे आहेत, आणि ते आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुकचे मधूसूदनन पिछाडीवर आहेत, आणि याचाच राग आल्यानं कार्यकर्ते अनावर झालेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2017 10:32 AM IST

अण्णा द्रमुकचे उमदेवार पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांचा राडा, मतमोजणी काही काळ थांबली

चेन्नई, 24 डिसेंबर : आज चार राज्यांमधल्या पाच विधानसभांच्या जागेवर पोटनिवडणूक होतेय. सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते चेन्नईतल्या आरके नगर विधानसभेच्या जागेवर. जयललितांचं गेल्या वर्षी निधन झाल्यामुळे त्यांची विधानसभेची जागा रिक्त होती. त्यासाठी तिथे पोटनिवडणूक झाली. पण आज मतमोजणी होत असताना आर के नगर मतमोजणी काही वेळासाठी थांबली. कारण अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला.

अण्णा द्रमुकचे उमदेवार पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांनी राडा केला.

मतमोजणी दरम्यान जयललितांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन अपक्ष म्हणून उभे आहेत, आणि ते आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुकचे मधूसुदनन पिछाडीवर आहेत, आणि याचाच राग आल्यानं  कार्यकर्ते अनावर झालेत.

लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र कामात ते अडथळा आणतायेत. काही वेळानं मतमोजणी सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 10:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...