दिल्ली हिंसाचारात माणूसकिचं दर्शन, घर पेटवायला निघालेल्या जमावापासून भाजप नेत्याने वाचवलं

दिल्ली हिंसाचारात माणूसकिचं दर्शन, घर पेटवायला निघालेल्या जमावापासून भाजप नेत्याने वाचवलं

एका कुटुंबियांच्या घराला दंगेखोर आग लावण्याच्या प्रयत्नात होता, त्यावेळी नगरसेवक पुढे आले आणि त्यांनी कुटुंबियांना वाचवलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : दिल्ली सध्या अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे. नागरिकत्व कायदा (CAA) वर झालेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन घटकांमध्ये बर्‍याच भागात हिंसाचार झाला आणि तेथील परिस्थिती सध्या तणापूर्ण आहे. अशा हिंसाचाराने धुमलत्यामध्ये दिल्लीत जातीय सलोख्याचं एक अनोख उदाहरण समोर आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाने एका मुस्लिम कुटुंबाला हिंसक वातावरणात बचावलं आहे.

एका कुटुंबियांच्या घराला दंगेखोर आग लावण्याच्या प्रयत्नात होता, त्यावेळी नगरसेवक पुढे आले आणि त्यांनी कुटुंबियांना वाचवलं. यमुना विहारचा स्थानिक नगरसेवक या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्यांचे घर जाळण्यापासून वाचवले. 150 लोकांचा हिंसक जमाव नागरिकांची घरं जाळण्याच्या प्रयत्नात होते.

एका अज्ञाताने वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'त्याच्या घराबाहेर गर्दी वाढू लागली. जमाव जोरदार घोषणा देत होते. पोलिसांनी बंदी घातलेली नव्हती अशा रस्त्यावर लोक गर्दी करीत होते. या भागात मुस्लिम बहुल आहे. इथे पोलीस आंदोलकांना आत प्रवेश करण्यापासून रोखत होते. जमावाने आमची कार गॅरेजच्या बाहेर काढली आणि बाईकही बाहेर काढली.

जमावाने पेटलेली बुटीक, 20 लाखांचे नुकसान

पीडितेने सांगितले की, जमावाने तिच्या घरासमोर बुटीक पेटविली. हा बुटीकमध्ये भाडेकरू होता. जमावाने माझी गाडी जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी माझ्या भाडेकरूंच्या दुकानात तोडफोड केली. त्याचे सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले. जमावाने कुटुंबालाही त्रास दिला.

नगरसेवकाचे सगळ्यांशी चांगले संबंध आहे. हा गोंधळ पाहून त्यांनी गर्दीमधून कुटुंबीयांपर्यंत पोहोचले आणि जमावाला अधिक नुकसान होण्यापासून रोखले. या कुटुंबात 2 महिन्याचे बाळ देखील आहे. जमावाला हल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना जोरदार विरोध करावा लागला.

भाजपच्या नगरसेवकाने घर जाळण्यापासून वाचवलं

पीडित कुटुंबातील सदस्याने सांगितले की, '' तणाव वाढताच मी माझ्या कुटूंबासमवेत पळून गेले. माझ्या घराला जाळण्यापासून वाचविणारे भाजपचे नगरसेवक होते. हिंसाचाराच्या आगीत दिल्ली जळत असताना ही बातमी समोर आली आहे. सीएएचे दोन समर्थक आणि सीएए विरोधक यांच्यात हा संघर्ष झाला जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीतच उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस दावा करत आहेत पण परिस्थिती तणावग्रस्त आहे. या चकमकींमध्ये किमान 150 लोक जखमी झाले, तर 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.

First published: February 26, 2020, 8:15 AM IST

ताज्या बातम्या