S M L

COSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' !

पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या हेडक्वार्टरमधील सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये हॅक करण्यात आले आहेत. ही रक्कम तब्बल 21 देशातून काढण्यात आली असल्याची माहिती समोर आली असली आहे.

Updated On: Aug 14, 2018 05:39 PM IST

COSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' !

पुणे, 14 ऑगस्ट : पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या हेडक्वार्टरमधील सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये हॅक करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तेही डिजीटल पद्धतीने टाकण्यात आलेला हा दरोडा म्हणजे भारतीय बँकिंग क्षेत्रातील 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' असल्याचे म्हटले जात आहे. कोणालाही थांग पत्ता न लागता, फेक ट्रान्झेक्शनच्या माध्यामतून ही रक्कम वळवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येताच, खडबडून जागे झालेल्या बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. ही रक्कम तब्बल 21 देशातल्या विविध शहरांमधील एटीएम मधून काढण्यात आली असल्याची माहिती समोर आली असली तरी कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातला डेटा कोणी हॅक केला ? कोठून केला ? असे अनेक प्रश्न आता पुणे सायबर सेलसमोर उभे ठाकले आहेत.

सिने स्टाईल झालेल्या या रॉबरीमुळे कॉसमॉस बँकेत एकच खऴबळ उडाली आहे. जवळपास 500 जणांच्या खात्यातून 94 कोटी रूपये हॅक करण्यात आले असल्याची माहिती असून, ही रक्कम तब्बल 21 देशातल्या विविध शहरांमधील एटीएम मधून काढण्यात आले आहेत. मात्र, कॉसमॉस बँकेचे अधिकारी मिलींद काळे यांनी, ग्राहकांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगून, ग्राहकांचा सर्व पैसा सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. बँकेत रॉबरी झाल्याचे त्यांनी मान्य केलंय.

तर, सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी 12 हजार ट्रांजेक्शन्सच्या माध्यमातून 94.2 कोटी रूपये हॅक होईस्तोवर बँकेचे अधिकारी झोपले होते काय असा प्रश्न केलाय. हॅक झालेली रक्कम पोलिसांनी फ्रीज करण्यात आली असल्यामुळे, ती भारतातच राहिली असल्यामुळे ग्राहकांना त्यांचा पैसा परत मीळू शकतो, त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ ऩये असे प्रशांत माळी यांनी म्हटले आहे.

पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या हेडक्वार्टरमधील 78 कोटी हाँग-काँगसह 21 देशांमधून हॅक झालेत, तर बाकिचे 14 कोटी भारतात्या विविध शहरांतील एटीएम मधून काढण्यात आले असल्याचे पुणे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. तर या प्रकरणात अन्य शहरांतील पोलिसांचीही मदत मागण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 05:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close