वजन कमी करण्यासाठी सीबीआयला संपर्क साधावा - कार्ती चिदंबरम

वजन कमी करण्यासाठी सीबीआयला संपर्क साधावा - कार्ती चिदंबरम

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयच्या ताब्यात असलेल्या कार्ती चिदंबरम याने एक अजब विधान केलं आहे.

  • Share this:

13 मार्च : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयच्या ताब्यात असलेल्या कार्ती चिदंबरम याने एक अजब विधान केलं आहे. जर वजन कमी करायचं असेल तर सीबीआयकडे या, असं कार्ती चिदंबरम म्हणाला आहे. सीबीआयच्या ताब्यात आलं की तहान भूक हरपून जाते आणि त्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते असं म्हणत कार्तीने सीबीआयला टोमणा मारला आहे.

सोमवारी विशेष न्यायालयात सुनावणीनंतर कार्तीला 24 मार्चपर्यंत दिल्लीच्या तिहाड कारागृहात पाठवण्यात आलं होतं. या दरम्यान, कार्तीने एका मुलाखतीत सांगितले की, 'माझी भुक मेली आहे. आता मी खूप कमी खातो. त्यामुळे माझं वजन कमी झालं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे.'

कार्ती हसत हसत पुढे म्हणाला की, 'माझे वजन इतकं कमी झालंय की माझे जुने कपडे आता मला खूप सैल होतात. त्यामुळे तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सीबीआयशी संपर्क साधावा.'

पण मला कोणतेही अधिकारी त्रास देत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, असंही कार्तीने स्पष्ट केलं. मला जेलमध्ये मोबाईलच काय तर घड्याळही वापरण्याची परवाणगी नाही आहे. त्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांना सारखं सारखं वेळ विचारायला मला मजा येते. अशी मजेशीर विधानंही कार्ती याने केली आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 01:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading