Home /News /national /

कोरोनामुळे पुन्हा निर्बंध? काश्मिरी पंडितांना CM ठाकरेंची ग्वाही, भाजपचं मिशन लोटस? TOP बातम्या

कोरोनामुळे पुन्हा निर्बंध? काश्मिरी पंडितांना CM ठाकरेंची ग्वाही, भाजपचं मिशन लोटस? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 5 जून : माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ईडी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. 'काश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही', अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन लोटस ठरलं असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा देशात मास्कसक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत जाणून घ्या. माझी वसुंधरा अभियान 2.0 माझी वसुंधरा अभियान 2.0 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा रविवार 5 जून रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत टाटा थिएटर, NCPA नरिमन पॉईंट येथे होत आहे. 'राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात तर लावून दाखवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या ईडी समन्सवरुन ईडी अधिकाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात तर लावून दाखवा, असा उल्लेख करत पटोलेंनी ईडीला धमकीवजा इशारा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'काश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही जम्मू आणि काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) होणाऱ्या अत्याचारामुळे खळबळ उडाली आहे.  'काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी दिले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांची पुन्हा अग्निपरिक्षा, सतेज पाटलांचं चॅलेंज! राज्यसभेच्या निमित्ताने कोल्हापूरचे उमेदवार सहाव्या जागेसाठी मैदानात उतरले आहेत. याच सहाव्या जागेवरून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे साहजिकच कोल्हापूरचे दोन पाटील पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. उमेदवारांऐवजी सतेज पाटील (Satej Patil) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात सामना होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपचं मिशन लोटस ठरलं राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर राज्यसभेची जबाबदारी सोपविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन नेत्यांमध्ये आशिष शेलार (Ashish Shelar), गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा समावेश आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. हॉटेलमध्येच आमदार फोडण्याचा भाजपचा प्लॅन? आमदार फुटू नये म्हणून भाजपने आपल्या आमदारांसाठी मुंबईतील पंचतारांकित ट्रायडेंट हॉटेल (trident hotel mumbai) बूक केले आहे. पण, याच हॉटेलमध्ये शिवसेनेच्या (shivsena) आमदारांना ठेवण्यात येणार होते. पण आता गोंधळ टाळण्यासाठी  येत्या 6 जून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शेतकऱ्यांच्या मदतीने पुण्यात इथेनॉलचे पंप पेट्रोलियम मंत्र्यांशी (Minister of Petroleum) बोलून यासाठी मार्ग काढून पुण्यासारख्या ठिकाणी इथेनॉलचे पंप (Ethanol pump) काढण्याचा आमचा निर्णय असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आगामी ऊस हंगामाबाबत शरद पवारांनी व्यक्त केली भीती भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून 3 हजार 600 मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. यासाठी महाराष्ट्रातील सहवीज निर्मीतींची मदत घेऊन वीज तयार करण्यासाठी आवश्यक माहिती माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शरद पवारांनी नातूच्या मंत्रीपदाबाबत दिले स्पष्ट संकेत आपल्याला नामदार होण्यासाठी आमदार होवून पाच वर्ष लागली होती. त्यानंतर आपण नामदार झालो होतो, असं विधान शरद पवारांनी केलं. त्यामुळे रोहित पवार पुढच्या काही वर्षांनी नामदार म्हणजेच मंत्री होतील, असे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली : संजय राऊत पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या संयुक्त मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संजय राऊत यांनी या कार्यक्रमात एका महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर दिलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मी रात्री बारा वाजता अमित शाहांना फोन केला, सांगितलं अटक करा, झुकेगा नहीं : संजय राऊत पुण्यात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत बोलत होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. केंद्र सरकारकडून कापूस आयात शुल्क सवलतीला मुदतवाढ कापूस (cotton) आणि धाग्यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कापूस आयात शुल्क सवलतीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. केंद्राचं 5 राज्यांना पत्र आणि राज्य सरकार मास्कसक्तीच्या तयारीत राज्यात विशेषत: राजधानी मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona Cases) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुढीपाडव्याच्या आधी राज्य सरकारने कोरोनासंबंधित सर्व निर्बंध हटवले होते. मास्क लावणंही ऐच्छिक केलं होतं. पण सततच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona, Jammu and kashmir

    पुढील बातम्या